मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) राजस्थानमधील सवाई माधोपूरमधील बरवाडा फोर्ट येथे लग्नबंधनात अडकले. या विवाहानंतर बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्संनी त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव केला. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने विक्की-कॅटरिनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. परंतु, सध्या अनुष्काच्या (विरूष्काच्या शेजारी) एका पोस्टमुळे विक्की-कॅटरिना त्याचे शेजारी राहायला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नुकतेच अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर विक्की-कॅटरिनाचा एक सुंदर लग्नातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्काने दोघांना खुपसाऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिले आहे की, 'दोघांचे अभिनंदन, तुम्ही लग्न केल्याने मला खूपच आनंद झाला आहे. आशा आहे की, तुम्ही आयुष्यभर एकमेंकाच्यासोबत राहाल, तुम्ही आता तुमच्या नव्या घरात लवकरच शिफ्ट होणार आहात, यानंतर तिने आता आम्हाला तुमच्या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज देखील येणार नाही. असे म्हटले आहे. याशिवाय तिने या पोस्टमध्ये विक्की – कॅटरिना यांना टॅग केलं आहे.
या पोस्टवरून अनुष्का आणि विराटच्या शेजारी ( विरूष्काच्या शेजारी) एका पोस्टमुळे विक्की-कॅटरिना त्याचे शेजारी राहायला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय एका रिपोर्टच्या माहितीनुसार, विरूष्का यांच्या शेजारीच सी-फेसिंग बिल्डिंगमध्ये एक प्लॅट विक्कीने भाड्याने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जुहूमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ज्या सी-फेसिंग बिल्डिंगमध्ये राहतात, त्याच अपार्टमेंटमध्ये विक्कीने एक फ्लॅट घेतला आहे. हा प्लॅट विक्कीने सी-फेसिंग बिल्डिंगमधील आठव्या मजल्यावर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतल्याचे बोलले जात आहे. या अपार्टमेंटचे दरमहा भाडे ९ लाख रुपये असून येथे लक्झरी सुविधादेखील आहे. याच अपार्टमेंटमध्ये लग्नानंतर दोघेजण राहायला येणार आहेत. कॅटरिना आणि विक्कीचे हे नवीन घर ५ हजार स्क्वेअर फुटांचे आहे.
अनुष्का हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहते कमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'तुम्ही दोघेही खूपच सुंदर दिसत आहात', प्रियांका चोप्राने 'आज मेरी यार की शादी है, दोघांना लग्नाच्या शुभेच्छा'. असे लिहिले आहे. तसेच प्रियांका आणि आलियासोबत दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीती चोप्रा या कलाकारांनी दोघांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. विक्की आणि कॅटरिनाने ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. या विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधील स्टार्ससोबत मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
हेही वाचलंत का?