Bipin Rawat MS Dhoni : धोनीचे ‘ते’ स्वप्न जनरल बिपीन रावत यांनी पूर्ण केले

Bipin Rawat MS Dhoni : धोनीचे ‘ते’ स्वप्न जनरल बिपीन रावत यांनी पूर्ण केले
Bipin Rawat MS Dhoni : धोनीचे ‘ते’ स्वप्न जनरल बिपीन रावत यांनी पूर्ण केले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bipin Rawat MS Dhoni : तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. या अपघातात भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस (CDS) जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत तसेच इतर १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या लष्करी सामर्थ्याला धक्का पोहचल्याची भावना देशवासीयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जनरल रावत यांच्या निधनानंतर अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक खेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींचे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

दरम्यान, दिवंगत जनरल बिपिन रावत आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्याविषयीचा एक खास किस्सा व्हायरल होत आहे. जनरल रावत यांनी धोनीला देशभक्तीचे धडे देत त्याचे स्वप्न पूर्ण केले होते. वास्तविक, धोनीने पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनरल बिपिन रावत यांच्यासमोर लष्करामध्ये प्रशिक्षण मिळावे अशी विनंती केली होती. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रावत यांनीच परवानगी दिली. (Bipin Rawat MS Dhoni)

देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी दोन वर्षांपूर्वी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, ज्याला प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल बनवले गेले होते. त्याला योग्य सैन्य प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली होती. धोनीने त्याला हे प्रशिक्षण देण्याची विनंती केली होती. भारताचा माजी कर्णधार धोनीची ही विनंती जनरल रावत यांनी मान्य केली होती. त्यानंतर धोनीने पॅराशूट रेजिमेंटमध्ये दोन महिने प्रशिक्षण घेतले. (Bipin Rawat MS Dhoni)

खरे तर जनरल बिपिन रावत यांचा असा विश्वास होता की, जेव्हा भारतातील नागरिक लष्कराचा गणवेश परिधान करतो तेव्हा त्याने निधड्या छातीने सर्व संकटांना सामोरे गेले पाहिजे. धोनीने तसा विश्वास जनरल रावत यांना दिल्यानंतरच त्याला लष्कराचा गणवेश परिधान करण्याची संधी देण्यात आली. धोनीही सामान्य सैनिकाप्रमाणे देशाचे रक्षण करेल, असे बिपीन रावत म्हणायचे.

धोनीने २०१९ मध्ये बिपिन रावत यांच्याकडे पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी मागितली होती. धोनी म्हणाला की, सैन्यासोबत राहून देशसेवा करणे हे त्याचे स्वप्न आहे. ही विनंती मान्य करून रावत यांनी त्यांला प्रशिक्षणाची परवानगी दिली. यानंतर धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या १०६ पॅरा टेरिटोरियल आर्मी बटालियनच्या प्रशिक्षणाचा भाग बनला. या प्रशिक्षणादरम्यान धोनीने सामान्य सैनिकांप्रमाणे गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी केली.

धोनीचा वेस्ट इंडिज दौ-यास नकार

त्यावेळी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जाणार होता. या दौ-याच्या पूर्वी बीसीसीआय संघ निवडणार होता. पण धोनीने बीसीसीआयला स्पष्ट केले की, तो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही, कारण त्याला पुढील दोन महिने भारतीय लष्करात कर्तव्य बजावायचे आहे.

धोनी आपले कर्तव्य बजावत आहे : जनरल रावत

अशा परिस्थितीत धोनीच्या काश्मीरमधील सुरक्षेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर रावत यांनीही मोठे वक्तव्य केले होते. प्रशिक्षणादरम्यान जनरल रावत यांनी धोनीबद्दल सांगितले होते की, तो सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहे. तो इतर सैनिकांप्रमाणेच संरक्षकाची भूमिका बजावेल. जेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाला लष्कराचा गणवेश परिधान करायचा असतो, तेव्हा तो गणवेश ज्या जबाबदारीसाठी त्याला देण्यात आला आहे ती पूर्ण करण्यास तो तयार असतो. धोनीने मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे आणि आम्हाला माहित आहे की तो ते कार्य पूर्ण करण्यास सक्षम आहे.

लेफ्टनंट कर्नल (मानद) महेंद्रसिंग धोनीचे मिशन काश्मीर ३१ जुलै २०१९ ला सुरू झाले. तो पुढे १५ ऑगस्ट पर्यंत दक्षिण काश्मीरमध्ये व्हिक्टर फोर्समध्ये तैनात होता. त्याचे पोस्टिंग दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा येथे होते. अवंतीपोरा हे गेल्या काही काळापासून दहशतवादी कारवायांचे केंद्र बनले होते. त्यामुळे धोनीच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले. धोनीने पहिल्यांदा लष्कराकडे प्रशिक्षणासाठी परवानगी मागितली होती, त्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी त्यास मान्यता दिली आणि व्हिक्टर फोर्ससोबत त्याचे प्रशिक्षण निश्चित झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news