नागपूर आगारातील आणखी २० एसटी कर्मचारी निलंबित

नागपूर आगारातील आणखी २० एसटी कर्मचारी निलंबित
Published on
Updated on

नागपुर; पुढारी वृत्तसेवा; नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील आणखी संपावरील २० एसटी कर्मचारी निलंबित केले आहेत.  आजपर्यंत एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १६ टक्क्यांवर गेल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचे हाल होत आहेत.

नवीन निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये रामटेक आगारातील १० आणि उमरेड आगारातील १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर विभागातील आजपर्यंतच्या एसटी कर्मचारी निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४२० वर पोहोचली आहे. तर रोजंदारी गटातील विभागातील सर्वच्या सर्व ९० कर्मचाऱ्यांच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सेवा समाप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, नागपूर विभागात एसटीचे हजेरीपटावर प्रशासकीय स्तरावरील ४८६, कार्यशाळा स्तरावरील ५५८, चालक गटातील ८९७, वाहक गटातील ६७१ असे एकूण २ हजार ६१२ कर्मचारी आहेत. त्यातील पाचशेच्या जवळपास कर्मचारी सेवेवर आहेत. तर ९४ च्या जवळपास कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत.

शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केल्यावर आंदोलकांत फाटाफूट होऊन बरेच कर्मचारी कामावर परतले होते. त्यामुळे विदर्भातील वर्धा, भंडारासह जिल्ह्यात एक- दोन दिवस सातत्याने दिवसाला ६ ते ८ बसेस धावल्या होत्या. परंतु, बुधवारी( दि.१) रोजी संध्याकाळी ६ वाजतापर्यंत विदर्भातील वर्ध येथे ३ आणि भंडाऱ्यात १ अशा केवळ ४ बस धावल्या. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news