इन्स्पेक्टर रकेल कधी काळी करायची फ्रिज दुरुस्तीचं काम! - पुढारी

इन्स्पेक्टर रकेल कधी काळी करायची फ्रिज दुरुस्तीचं काम!

पुढारी ऑनलाईन डेस्क

मनी हाएस्टच्या (money heist) सीझनमधील इन्स्पेक्टर रकेल सर्वात अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. पहिल्या सीझनमध्ये इन्स्पेक्टर रकेल ही प्रोफेसर आणि त्याच्या गँगला पकडण्यासाठी पळत असते. (money heist) चौथ्या सीझनमध्ये ती लाल हूडी आणि जाळीदार मास्क लावून बँक ऑफ स्पेनमध्ये सोनं लूटत असते. तुम्हाला तिच्याषयी माहिती आहे का? तिचं खरं नाव आहे-इतजियार इटूनो. (Itziar Ituño)

इन्स्पेक्टर raquel उर्फ लिस्बनची भूमिका साकारणाऱ्या इतजियार इटूनोला कधीकाळी नोकरी शोधूनदेखील कुठेही नोकरी मिळाली नव्हती.

‘सेक्स मशीन’ चित्रपटातून सुरुवात

इतजियार इटूनो मार्टिनेज हिचा १८ जून, १९७४ रोजी इतजियारचा जन्म स्पेनमधील बसौरी शहरात झाला. खूप कमी वयात इतजियारच्या आई-वडिलांचे निधन झाले. तिने अभिनयाचे प्रशिक्षण थिएटर स्कूलमधून पूर्ण केले. तिने अर्बन इंडस्ट्रीयल आणि पॉलिटिकल सोशिओलॉजीतून पदवी पूर्ण केली.

१९९५ मध्ये तिने तिने पहिल्यांदा ‘सेक्स मशीन’ नावाच्या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. १९९७ मध्ये तिचं अभिनय क्षेत्र बहरलं. ‘अगुर ओलेंट झिरो अगुर’ नावाच्या चित्रपटातून ती ओळखली जाऊ लागली.

२००१ मध्ये तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं. ‘गोइंकाले’ नावाच्या शोतून तिच्या छोट्या पडद्यावरील करिअरची सुरूवात झाली. इतजियारने नेकाने नावाच्या बायसेक्शुअल पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘गोइंकाले’चा हा शो २००१ ते २०१५ असा दीर्घकाळ सुरू होता. २०१५ ते २०१७ दरम्यान, तिने आणखी काही टीव्ही शोजमध्ये काम केलं. त्यानंतर २०१७ मध्ये तिने ‘ला कसा दे पापेल’ मध्ये काम केलं. पुढे मनी हाएस्टच्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली.

शोधूनही नोकरी नाही मिळाली

इतजियारने पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधली. पण, तिला नोकरी नाही मिळाली. मग, तिने आपल्या वडिलांप्रमाणे एका फ्रिज तयार करणाऱ्या कंपनीत काम करणं सुरू केलं. तिथे ती फ्रीजर, छोटे फ्रिज आणि फ्रिजचे दरवाजे तयार करायची. काम करताना तिच्यासोबत असणाऱ्या लोकांनी तिला सांगितलं की, तिला अभिनय क्षेत्रात काम करायला हवं. सहकाऱ्यांच्या प्रोत्साहनानंतर तिने थिएटर करणं सुरू केलं. तिथे ती अभिनयात आणखी बहरली.

अभिनेत्री आणि गायिकाही

इतजियार केवळ अभिनेत्री नाही तर एक गायिकादेखील आहे. तिने स्पेनच्या तीन प्रसिध्द बँडसोबत अनेक गाणीदेखील केली आहेत. पण, संगीताच्या विश्वात सर्वाधिक लोकप्रियता तिला रॉक बँड Ingot सोबत मिळाली. रॉक म्युझिकशिवाय इतजियार फेमिनिज्म सारख्या मुद्द्यांवर ती गाणी तयार करत राहिली. याशिवाय तिने एक सिंगल गाणंदेखील गायलं आहे. त्याचं नाव होतं- ‘कलर्स ऑफ द विंड’.

इतजियारमुळे ‘मनी हाएस्ट’ बंद करण्याची झाली होती मागणी

स्पेनमध्ये इतजियारच्या ‘ला कासा द पापेल’ बॅन करण्याची मागणी केली होती. नेटकऱ्यांचं म्हणणं होतं की, निर्मात्यांनी या शोमधून तिला काढावं. नाही तर शो चालू देणार नाही.

रकेलच्या भूमिकेविषयी ती म्हणते-

इन्स्पेक्टर रकेलच्या भूमिकेविषयी म्हणते, तिला आधी ही भूमिका तितकी आवडायची नाही. पुढे तिला भूमिकेची जाणीव झाली.

इतजियारने गायलं होतं सुष्मिता सेनचं गाणं

‘मनी हाएस्ट’ची लोकप्रियता भारतातदेखील आहे. तिने इंडियन मीडियालादेखील मुलाखत दिली होती. तिला मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, तिने एखादा भारतीय चित्रपट पाहिलाय का? त्यावेळी तिने थेट गाणं गायलं.

इतजियारने ‘बीवी नंबर वन’ चित्रपटातील गाणं गायलं होतं. तिने ‘चुनरी चुनरी’ हे गाणं गायलं. चुनरी गाणं सुष्मिता सेन, सलमान खानवर चित्रीत करण्यात आलं होतं. तिच्या आवाजातील गाणं सुष्मिता सेनपर्यंत पोहोचलं. सुष्मिताने व्हिडिओला कोट करत लिहिलं होतं-‘ये बात’.

Back to top button