सातारा : पावसाचा तडाखा; वाईत २० बकऱ्यांचा मृत्यू - पुढारी

सातारा : पावसाचा तडाखा; वाईत २० बकऱ्यांचा मृत्यू

भुईंज; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे देगाव येथील शिवारात वीस बकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मेंढपाळ आणि शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

भिरडाची वाडी भुईंज (तालुका वाई) येथील शिवाजी शँकर धायगुडे हा मेंढपाळ बकऱ्यांचा कळप घेऊन देगाव येथील शिवारात थांबला होता. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे अचानक पावसाचा जोर वाढला. पाऊस आणि हवामानात वाढलेल्या गारट्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आठ वाजता एकूण २० बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने व दहा अंत्यवस्थ असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

या घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळताच त्यांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पाठवली. ते स्वतः भेट देण्यासाठी घटनास्थळाकडे निघाले आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button