पुढारी ऑनलाईन
युवराज सिंह आणि हेजल कीच यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हेजल कीच हिने आपल्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने हा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी त्यांच्या लग्नातील हा फोटो समोर आला नव्हता.
हेजलने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आणि युवराज हे क्यूट कपल दिसत आहे. सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फॅन्सने त्यांना लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोंसोबत तिने युवराजसाठी एक खास नोटदेखील लिहिलीय.
हेजल सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाईट आहेत. या फोटोमध्ये युवराज सिंह खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करताना तिने युवराजसाठी आपलं प्रेम व्यक्त केलंय. तिने लिहिलंय, 'जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा मला समजलं होतं की, काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे. परंतु, मला हे माहिती नव्हतं की, माझं आयुष्य नेहमीसाठी बदलेल.'
तिने आपल्या नोटमध्ये लिहिलंय-'सर्वात मोठ्या बदलासोबत ५ वर्षांच्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यात एक असा आनंद आला की, त्याविषयी मला माहिती नव्हतं. आणि न मी त्याच्या शोधात होते. माझं आयुष्य पूर्ण करण्यासाठी आपले आभार. आय लव्ह यू'.
तिच्या या पोस्टला सोशल मीडियावर ६३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
लग्नाच्या पाचव्या वाढदिवसावर युवराज सिंहनेदेखील हेजलसोबत फोटो शेअर करत एक स्पेशल नोट लिहिलीय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, '५ वर्षे आणखी मजबूत. आय लव्ह यू आणि आय मिस यू. आपण लवकरचं एकत्र असू. लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी.
युवराज आणि हेजलने २०१५ मध्ये १२ नोव्हेंबरला साखरपुडा केला होता. ३० नोव्हेंबरला दोघांनी लग्न केलं. हेजलने करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. सलमान खानचा चित्रपट बॉडीगार्डमध्ये सेकेंड लीड अभिनेत्री म्हणून तिने काम काम केलं. या चित्रपटात ती करीना कपूरची मैत्रीण दाखवण्यात आलीय.