'बॉईज २' फेम प्रतिक लाडचे 'टपोऱ्या डोळ्यात' गाणं आलंय - पुढारी

'बॉईज २' फेम प्रतिक लाडचे 'टपोऱ्या डोळ्यात' गाणं आलंय

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘खंडेराया झाली माझी दैना’, ‘दिवाना’ या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ‘टपोऱ्या डोळ्यात’ हे नवे गाणे अभिनेता प्रतिक लाड चाहत्यांसाठी घेऊन आला आहे. ‘चेतन गरुड प्रॉडक्शन’ च्या दिलखेच ‘टपोऱ्या डोळ्यात’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘चेतन गरुड प्रॉडक्शन’ने चाहत्यांचय्या हट्टापायी ‘टपोऱ्या डोळ्यात’ या गाण्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ‘चेतन गरुड प्रॉडक्शन’ आणि विकास दुबे निर्मित ‘टपोऱ्या डोळ्यात’ हे गाणे युट्युब चॅनेलवर झळकले असून या गाण्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे.

या गाण्याचे विशेष म्हणजे या गाण्यात ‘बॉईज २’ चित्रपटातील अभिनेता प्रतिक लाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतिकचा धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला या गाण्यातून प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. ‘टपोऱ्या डोळ्यात’ हे एक रोमँटिक सॉंग असून यात प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाचे अचूक वर्णन करण्यात आले आहे. आताच्या तरुणाईला भावेल असेच हे गाणे आहे.

प्रतिक लाड आणि अभिनेत्री सोनाली दळवी यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हे गाणे पंकज दत्तू वारुंगसे यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. तर गायक ऋषिकेश शेलार यांनी गाणे स्वरबद्ध केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून चेतन रविंद्र गरुड यांनी स्वतः बाजू सांभाळली असून चेतन महाजन आणि राहुल जी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली हे गाणे दिग्दर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण कॅमेरामॅन रुपेश पैकराव यानी केले आहे.

प्रतिक लाडचा रोमॅंटिक आणि थोडासा विनोदी अभिनय पाहण्यासाठी ‘टपोऱ्या डोळ्यात’ या गाण्याला पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. फार कमी वेळात या गाण्याला मिळालेल्या विशेष पसंती पाहून हे गाणे नक्कीच चाहत्यांच्या मनात ठसा उमटवेल अशी दिग्दर्शकाची आशा आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button