Corona : ‘म्युटेशन पाहून मला धक्काच बसला ;’ Omicron चा शोध कसा लागला? | पुढारी

Corona : ‘म्युटेशन पाहून मला धक्काच बसला ;’ Omicron चा शोध कसा लागला?

Omicron शोधणाऱ्या संशोधकांची मुलाखत

पुढारी ऑनलाईन डेस्क

९ नोव्हेंबरला रकेल व्हायना यांनी कोरोना व्हायरसच्या ८ सॅंपलचे जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण केली. लान्सेट या दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या प्रयोगशाळेत त्या प्रमुख आहेत. सिक्वेन्सिंगचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. 

जे सँपल तपासले जात होते, त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर म्युटिशेन झालेलं आहे. विशेषतः हे म्युटेशन स्पाईक प्रोटिनमध्ये झालेले होते. 

“मी जे पाहात होते ते फारच धक्कादायक होते. टेस्टिंगमध्ये आम्ही काही चूक तरी केलेली नाही ना? असा प्रश्न मनात येत होता,” रकेल यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. दुसऱ्या वेळी माझ्या मनात खेदाची भावनाही होती, कारण जे निष्कर्ष निघाले होते, त्याचे मोठे परिणाम होणार होते, त्यांनी सांगितले.

रकेल यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेसमधील संशोधक डॅनिएल अमौको यांनाही माहिती दिली. 

या शोधामुळे जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा देण्यात आला. 

तपासले ३२ सँपल

अमौको आणि त्यांच्या टीमने २० आणि २१ नोव्हेंबरला दोन दिवस या ८ सँपलवर काम केलं. ८ ही सँपलमध्ये एकच प्रकारचे म्युटेशन असल्याचे दिसून आले. 

Omicron www.pudhari.newsआपल्या संशोधन पद्धतीत काही चूक झाली आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनात येत होता. पण त्यांच्या लक्षात आले की गेल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण दक्षिण आफ्रिकेत वाढत आहेत, याचाच अर्थ हे नवीन म्युटेशन असणार. 

जगात सध्या प्रभावी ठरत असलेल्या डेल्टा व्हॅरिएंटपेक्षा हा व्हॅरिएंट वेगळा होता. 

२३ नोव्हेंबरला अजून ३२ सँपल तपासण्यात आले, तेव्हा हे नवीन व्हॅरिएंट असल्याचे निष्पन्न झाले.  

या टीमने ही माहिती दक्षिण आफ्रिकेतील जिनोम सिक्वेन्सिंग करणाऱ्या सर्व प्रयोगशाळांना दिली. 

Omicron चा शोध आणि पुढची दिशा

त्याच दिवशी ही माहिती GISAID या जागतिक सायन्स डेटाबेसला ही माहिती देण्यात आली. तेव्हा बोत्सवाना आणि हाँगकाँग या दोन देशांतून अशा प्रकारचे जिनोम सिक्वेन्सिंग आढळून आले. २४ नोव्हेंबरला ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आली. 

या व्हॅरिएंटवर आताचे व्हॅक्सिन प्रभावी आहेत का, या व्हॅरिएंटची लक्षणं किती तीव्र असतील, त्याचा वेगवेगळ्या वयोगटात किती परिणाम होतो, ही सर्व उत्तर मिळण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.

हेही वाचा

पाहा व्हिडिओ – Omicron बद्दल सर्व माहिती

Back to top button