पिंपरीत हिवाळ्यात पाऊस | पुढारी

पिंपरीत हिवाळ्यात पाऊस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

ऐन डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका सुरु होण्याऐवजी पाऊस पडल्याने आज (बुधवारी) छत्री व रेनकोट घेवूनच बाहेर पडावे लागले. पिंपरी -चिंचवड शहरात  सकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली .

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडकर नोव्हेंबर महिन्याचा उकाडा अनुभवत होते. मात्र, अखेरीस दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवला आहे. दोन दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड शहरात ढगाळ वातावरण होते. थंडीत देखील वाढ झाली होती. त्यामुळे पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मुंबई : अभिनेत्री निकिता दत्तावर हल्‍ला करुन चाेरट्यांनी माेबाईल हिसकावला

आज सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामावर जाणारे कर्मचारी छत्री व रेनकोट घेवूनच बाहेर पडले. नऊनंतर मात्र, पावसाचा जोर वाढला त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. शहराच्या अनेक भागात दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. पावसाच्या हजेरीने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. तर आणखी तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

दिल्लीत पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

आरोग्याची काळजी घेण्याची गरज सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नवीन ओमायक्रॉन विषाणूचे संकट उभे राहिले. अशातच वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, थंडी व इतर वायरल इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

सामान्य थंडी तापामुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकस आहार आणि शक्यतो घराबाहेर न निघण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहेत. तसेच आजार जाणवल्यास तात्काळ तसेच वेळीस उपचार घेणे महत्वाचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामध्येच पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात होणार्‍या बदलामुळे आजरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन संबंधित तज्ज्ञां‍कडून करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’

अशाप्रकारच्या वातावरणामुळे सर्दी, ताप, श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. फ्ल्यू सदृश  आजार वाढण्याचा धोका असतो. यापूर्वी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे आजार वाढले होते. आता अचानक आलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून होणारे किटकजन्य आजार वाढण्याची शक्यता असते.

-डॉ. किशोर खिलारे ( शहरी आरोग्य अभ्यास आणि संस्थापक सदस्य, जनआरोग्य मंच)

Back to top button