Disha Patani Video : दिशा पटानीने नाकाची केली प्लास्टिक सर्जरी? ट्रोलर्स म्हणाले... | पुढारी

Disha Patani Video : दिशा पटानीने नाकाची केली प्लास्टिक सर्जरी? ट्रोलर्स म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा (Disha Patani) एक व्हिडिओ सध्‍या धुमाकूळ घालत आहे; पण  तिचा हा लूक पाहिल्यांनतर ती ट्रोल होऊ लागली.

प्रीमियरमध्ये गेली होती दिशा

सलमान खान-आयुष शर्माचा चित्रपट ‘अंतिम’ २६ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. रिलीजच्या आधी बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीज चित्रपट स्क्रीनिंगसाठी उपस्थित होते. यावेळी सलमानची ‘राधे’ को-स्टार दिशाने हजेरी लावली. यावेळचे तिचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते पाहिल्यानंतर लोक तिच्या लुक्सवर कमेंट्स करू लागले. काही लोक म्हणू लागले दिशाने सर्जरी केलीय.

Mike Tyson : प्रसिद्ध बाॅक्सर माईक टायसन मॅचपूर्वी करायचा सेक्स, कारण…

दिशाच्या नाकाची चर्चा

‘अंतिम’च्या प्रीमियरवर दिशा यलो टॉप-ब्लू जीन्स घातली होती. तिने फोटोग्राफर्सना पोझ देखील दिले; परंतु तिचा हा व्हिडिओ (Disha Patani Video) समोर आल्यानंतर लोक तिच्या नाकावरून खिल्ली उडवू लागले. दिशाने नाक उंच दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे.

Disha Patani

दिशा दिसणार एक विलेन रिटर्न्समध्ये

दिशा (Disha Patani), जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर सोबत एक विलेन रिटर्न्समध्ये दिसणार आहे. याशिवाय ती मोहित सूरी दिग्दर्शित चित्रपट ‘एक विलेन: देयर इज वन इन एवरी लव्ह स्टोरी’ च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. सिद्धार्थचा आगामी चित्रपट ‘योद्धा’ मधेही ती झळकेल. दिशा (Disha Patani) सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले वेगवेगळ्या अंदाजातील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Disha Patani

हेही वाचलं का? 

Back to top button