Mike Tyson : प्रसिद्ध बाॅक्सर माईक टायसन मॅचपूर्वी करायचा सेक्स, कारण...  | पुढारी

Mike Tyson : प्रसिद्ध बाॅक्सर माईक टायसन मॅचपूर्वी करायचा सेक्स, कारण... 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅक्सिंग स्पर्धेतील प्रचंड आक्रमक म्हणून ओळखला जाणारा बाॅक्सर माईक टायसन (Mike Tyson) पुन्हा माध्यमांच्या चर्चेत आला आहे. त्याच्या संदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बाॅक्सिंग रिंगमधील आक्रमकतेमुळे तो कित्येक वेळा तुरुंगातही गेलेला आहे. त्याने एक प्रतिस्पर्धी खेळाडूचा कान चावला होता.

टायसनच्या ड्रायव्हरने सांगितलं गुपीत

मुख्य मुद्दा असा की, माईक टायसनच्या (Mike Tyson) ड्रायव्हरने तो मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. रुडी गोन्झालेझ असं नाव असणाऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की, टायसनकडे प्रचंड ऊर्जा असयाची. त्यामुळे तो ज्यावेळी बाॅक्सिंग रिंगमध्ये उतरायचा, त्यापूर्वी त्याला सेक्स करावा लागायचा. कारण, त्याला अशी भीती वाटायची की, आपला प्रतिस्पर्धी बाॅक्सिंग रिंगमध्ये आपल्याकडून जीवानिशी मरेल.

Mike Tyson

आपला प्रतिस्पर्ध्याचा जीव जाऊ नये म्हणून तो आपली ऊर्जा खर्च करण्यासाठी सामना सुरू होण्यापूर्वी सेक्स करायचा. द सन नावाच्या ब्रिटिश वृत्तपत्राशी संवाद साधताना माईक टायसनच्या ड्रायव्हरने खुलासा केला आहे. तो पुढे म्हणतो की, “सामना सुरू होण्यापूर्वी त्याला सेक्स करावा लागायचा. त्यामुळे त्याची गाडी चालविण्याबरोबर सामन्यापूर्वी त्यासाठी एखादी स्त्री शोधणंही माझं काम होतं. जेणे करून ती स्त्री त्यासोबत संबंध ठेवण्यासाठी तयार असेल.”

Mike Tyson

“माईक टायसन सांगत असे की मी जर मॅचपूर्वी सेक्स केला नाही तर माझा प्रतिस्पर्धी माझ्या हातून मरून जाईल. सेक्स केल्यानंतर तो थोडा शांत व्हायचा आणि म्हणायचा की आज माझा प्रतिस्पर्धी माझ्या हातून वाचू शकेल. तो एका प्रचंड ताकदीचा होता. त्याच्याकडे समोर येणाऱ्या कुणालाही मारून टाकण्याची धमक होती”, असंही माईक टायसनचा ड्रायव्हर रुडी गोन्झालेझ सांगितलं.

माईक टायसनची कर्तबगारी

टायसन जेव्हा रिंगणात उतरायचा, त्यावेळी चांगल्या चांगल्या प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरायची. तो बचावात्मक पवित्रा उत्तम घ्यायचा. पण, प्रतिस्पर्ध्यावर प्रचंड ताकदीने तुटून पडायचा. त्याच्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्याने कित्येक प्रतिस्पर्ध्यांना पहिल्याच फेरीत बाद केलेले आहे. टायसनने केवळ २० व्या वर्षीच पहिला वर्ल्ड चॅम्पियनशीप बेल्ट जिंकलेला होता.

Mike Tyson

टायसन प्रशिक्षक कॅस डायमोटांना वडिलांसारखं मानायचा. त्याने कॅस यांना वडील मानले. जेव्हा कॅस यांचे निधन झाले तेव्हा टायसनला मोठा धक्का बसला. आजही तो त्यातून सावरलेला नाही. मुलीच्या मृत्यूनंतरही टायसन धक्क्यात होता. सध्या त्याची आक्रमकता बरीच कमी झालेली आहे. तो शांत राहत असतो.

हे वाचलंत का? 

Back to top button