Anupam Kher : अनुपम खेर यांचा ५२२ वा सिनेमा येतोय लवकरच, ‘कू’ वर शेअर केले पोस्टर

anupam kher
anupam kher

मुंबई : पुढारी ऑनलाईन : भारतीय सिनेमावर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आगळावेगळा ठसा उमटवलेले अनुपम खेर (Anupam Kher) यांचा ५२२ वा सिनेमा 'कनेक्ट' लवकरच प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात खेर यांच्यासह दक्षिणेतली लेडी सुपरस्टार नयनतारा ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहे.सोबतच अश्विन सर्वनन आणि विग्नेश शिवन हेसुद्धा सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत. खेर यांनी 'कू'वर सिनेमाचे पोस्टर शेअर करत शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझा ५२२ वा चित्रपट हा तमिळ चित्रपट असणार आहे. आभार प्रिय नयनतारा, अश्विन सर्वनन आणि विग्नेश शिवन आणि रॉवडी पिक्चर्सशी जोडलेल्या सर्वांचे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि कौतुक उर्जा देणारे आहे. 'कनेक्ट' या सिनेमाचा भाग असणे मला सुखावून गेले. इतक्या कुशल, बुद्धीमान टीमसोबत काम करण्याचा अनुभव खास होता. तुम्हा सगळ्यांची थिएटरमध्ये वाट पाहेन… जय हो!!", असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

'कनेक्ट'च्या डार्क थीम असलेल्या पोस्टरमध्ये 66 वर्षांचे खेर एका धर्मगुरूच्या वेषात दिसत आहेत. सोबतच पोस्टरवर लिहिलं आहे, अनुपम खेर तुमचं स्वागत आहे."

या सिनेमाव्यतिरिक्त खेर यांचे इतरही अनेक सिनेमे येत्या काळात पहायला मिळतील. 'द काश्मिर फाइल्स' रिलीजसाठी तयार आहे. विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मिथून चक्रवर्तीनेही काम केले आहे.याशिवाय अनुपम खेर (Anupam Kher) सध्या आगामी चित्रपट 'ऊंचाई'च्या चित्रिकरणात व्यस्त आहेत.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news