Pandu Movie : सोनाली म्हणते, पांडूमधील केळेवालीचा तुम्हाला कोणता लूक आवडला ? | पुढारी

Pandu Movie : सोनाली म्हणते, पांडूमधील केळेवालीचा तुम्हाला कोणता लूक आवडला ?

 पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेसृष्टीची अप्सरा, मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने  (Sonalee Kulkarni) आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर पांडू (Pandu Movie)  चित्रपटातील लुकचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  (Sonalee Kulkarni’s latest photos) 

Sonalee Kulkarni

मनावरची मळभ हटवून टाकलीत

सोनालीने पांडु (Pandu Movie ) या चित्रपटातील आपल्या लुकचे फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना विचारले आहे की, तुम्हाला #केळेवाली चा कोणता लूक सगळ्यात जास्त आवडला ??? तिच्या या फोटोवर आणि प्रश्नांवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत. भिती, हाहाकारच्या दोन वर्षांनंतर मनावरची मळभ हटवून टाकलीत 💖💖, सकाळ सोनेरी झाली.., सोना बाई खुप सुंदर, सुंदर दिसताय मॅडम, तुम्ही केळीवालीच मस्त आहे.. लुक च काय नाही, तुमच्या सारखी सुंदर पोरगी माझ्या गावात असती तर मी गावच सोडून गेलो नसतो, अति कडक, खतरनाक दिसत आहात मॅडम, मराठीमधील आमची श्रीदेवी अशा भन्नाट कॉमेंट्स आल्या आहेत. 
Sonalee Kulkarni

Pandu Movie गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

सोनालीचा नूकताचं झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सूरू आहे. मल्टीस्टार असलेल्या या चित्रपटाचे कौतूक होत आहे. तिचा ३ डिसेंबरला पांडु हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित  होणार आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर मुख्य भूमिकेत भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी आदी कलाकार आहेत. नूकतीचं या चित्रपटातील काही गाणी प्रदर्शित झाले आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शिवली आहे. केळेवाली, बुरूम बुरूम, दादा परत याना, जाणता राजा ही गाणी खूप चर्चेत आहेत. केळेवाली या गाण्याने तर हवाच केली आहे. तिची होवून गेलेला शटर या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजली. लवकरचं ती ‘छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. 

Sonalee Kulkarni

सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. तिचा सोशल मीडियावर खुप मोठा फॅनवर्ग आहे. 

Sonalee Kulkarni

हेही वाचा : 

Back to top button