'आरडाओरडा कमी कर’ : गायत्री-मीरा यांच्यात जोरदार भांडण | पुढारी

'आरडाओरडा कमी कर’ : गायत्री-मीरा यांच्यात जोरदार भांडण

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री-मीरा यांच्यामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले. नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं. गायत्री-मीरा यांची मैत्री टिकणार का?

टास्कसाठी सगळेच सदस्य सुंदर तयार होऊन सज्ज आहेत. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना दोन टिम्समध्ये विभागले आहे म्हणजेच TEAM A आणि TEAM B. कोणती टीम विजयी ठरणार, याचा निकाल गायत्री लावणार असे प्रोमोमध्ये दिसून येते आहे. घरातील सदस्य छान perform करताना दिसत आहेत.

गायत्रीने यामध्ये जाहीर केले, टीम A ला मला हा चान्स द्यावा असं वाटतं आहे. त्यावर मीराने रागाने सांगितले मी स्टेज सोडणार नाही. वाचा आधी नीट आणि मग सांगा. त्यावर गायत्रीचा पारा देखील चढला आणि ती मीराला म्हणाली, आरडाओरडा कमी कर. बस चल तिकडे. आणि यानंतर वाद वाढतच गेला. बघूया आज घडणार टास्कमध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button