नागपूर विधान परिषद : छोटू भोयर विरुद्ध बावनकुळे सामना रंगणार | पुढारी

नागपूर विधान परिषद : छोटू भोयर विरुद्ध बावनकुळे सामना रंगणार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर विधान परिषद निवडणूक : नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत आज अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे छोटू भोयर यांचा अर्ज कायम आहे. यामुळे आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे छोटू भोयर असा सामना बघायला मिळणार आहे. अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी अर्ज मागे घेतला. तर आणखी दोन उमेदवारांनी माघार घेतली. नागपुरातील निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा रंगली असतानाच छोटू भोयर मैदानात कायम असल्याने आता निवडणूक रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आगामी विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपतर्फे (BJP) माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रसचे छोटू भोयर अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी छोटू भोयर यांच्या नावाची घोषणा केली. (नागपूर विधान परिषद निवडणूक)

छोटू भोयर हे १९८७ पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या ३४ वर्षांपासून भाजपमध्ये होते. छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. २० वर्षे ते नगरसेवक राहिलेत. नागपूरचे उपमहापौरपदही त्यांनी भूषवले होते. छोटू भोयर यांनी नागपूर महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक सुद्धा आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

Back to top button