चर्चा तर होणारच! सख्ख्या सहा बहिणींनी एकाच मंडपात घेतले सात फेरे; एकाच वेळी वरातीही | पुढारी

चर्चा तर होणारच! सख्ख्या सहा बहिणींनी एकाच मंडपात घेतले सात फेरे; एकाच वेळी वरातीही

झुंझुनू : आतापर्यंत तुम्ही दोन, तीन बहिणींची एकत्र लग्न पाहिली किंवा ऐकली असतील. परंतु झुंझुनू जिल्ह्यातील खेतडीजवळील चिरानी गावात सहा बहिणींचे एकत्र लावलेले लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे. रोहितश्व यांनी आपल्या सात मुलींपैकी सहा मुलींचे एकत्र लग्न केली आहेत. सहाही मुलींनी एकत्र फेरे घेतल्यानंतर त्यांनी एकत्र घोड्यांवर बसवून त्यांची वरात देखील काढली.

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, अमल महाडिक यांची माघार

या हटके लग्नाची घटना राजस्थानातील झुंझनू जिल्ह्याच्या खेतडी तालुक्यातील चिरानी गावातील आहे. गावातील रहिवासी रोहिताश्व यांना एकूण सात मुली आणि एक मुलगा आहे. रोहिताश्व हे स्कुलबस चालक असून त्यांनी आपल्या सहा मुलींचं एकत्रित लग्न केलं आहे. सहा मुलींचं एकत्र लग्न केलं असलं तरी, त्यांनी लग्नात कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. या लग्नासाठी तीन गावातून वऱ्हाडी मंडळी आले होते. या अनोख्या लग्नात संपूर्ण गाव उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचवेळी मुलींची पाठवणी करताना कुटुंब आणि गावकरी भावूक झाले. कारण सहा मुलींच्या निरोपानंतर बापाचं अंगण एकदम सुनंसुनं होणार होतं.

धुळे- नंदुरबार विधान परिषद : भाजपचे अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड

मुलींचा भाऊ विकास गुर्जर यांनी सांगितले की, त्यांचे वडील रोहितश्व स्कूल बस चालवतात. परंतु त्यांनी मुलींना शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांची बहीण मीना आणि सीमा यांनी एमए बीएड केले आहे. त्याच वेळी, अंजू आणि निक्की एमएम केलंआहे. योगिता आणि संगीता बी.एस्सी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वात धाकटी बहीण कृपा. जिचे अजून लग्न झालेले नाही, तिनेही बीएससी पूर्ण केलं आहे. सर्वच मुली अभ्यासात हुशार आहेत.

दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थानांच्या अडचणीत वाढ!

भावाला राष्ट्रपती पुरस्कार

मिळालेल्या माहितीनुसार या बहिणींच्या भावाला स्काउट्समध्ये राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय वेळोवेळी ते सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. तसेच त्यांनी अनेक अल्बममध्येही काम केले आहे. कोरोनाच्या काळात विकास गुर्जर यांच्या मार्गदर्शनात बहिणी आणि कुटुंबीयांनी घरी मास्क बनवले. या मास्कचे लॉकडाऊनमध्ये वाटप करण्यात आले.

Back to top button