बिग बॉस मराठी : सोनाली पाटील म्हणते, मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत | पुढारी

बिग बॉस मराठी : सोनाली पाटील म्हणते, मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज विकास आणि सोनाली पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद होणार आहे. आता ही वादाची ठिणगी कोणामुळे पडली ? नक्की काय घडलं ? हे आपल्याला आजच्या भागामध्ये कळेलच… पण मीनल सोनाली पाटील हिला समजवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे की, जे काही ते विकासशी बोलून सोडवून टाक… पण पाटील- विकास आणि मीनलचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये असे दिसून येत आहे.

मीनलचे तिला सांगणे आहे स्वत:ला त्रास करून नको घेऊस. तुझे मुद्दे त्याला बोल. पण आरामात बोल, तो पण आरामात ऐकतो आहे. ती मीनलला विकासबद्दल उद्देशून सांगताना दिसणार आहे. नाही गं हे बोलायला लागले की माझ्या डोक्याचा टेंपरचं गरम होतो. त्याला तसली सवय आहे… त्याला ना हजार लोकांना tackle कराची सवय आहे. हजार लोकांना गोल गोल फिरवायची सवय आहे. हे बघ आपल्याला तसंल काही येत नाही.

साधी गोष्ट आहे, हे खटकलं… विकासचे म्हणणे आहे, शिकून घे माझ्याकडून हे, चांगली गोष्ट आहे ना मला tackle करता येते ते… की भांडण, वचावचा करणे चांगले आहे? sonali चे म्हणणे आहे, मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत. मी शांतपणे इथे बसले होते… विकास म्हणाला, मी स्वत:हून आलो सॉरी बोलायला… म्हणजे तसं सॉरी नाही… आता नक्की कोण रागावलं आहे का? खरंचं काही झाले आहे का ? नक्की काय झाले आहे ? हे आजच्या भागामध्ये कळेल. पाहा  बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button