बिग बॉस Marathi : विशाल बाथरूममध्ये झोपला? | पुढारी

बिग बॉस Marathi : विशाल बाथरूममध्ये झोपला?

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस Marathi) घरामध्ये राहणे तितकंस सोप नाहीये हे आता सदस्यांना कळून चुकले असणार. काल बिग बॉस यांनी केलेल्या घोषणेनुसार घरातील जे दोन सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरले त्यांना बिग बॉस यांनी दिलेल्या अवघड शिक्षेस सामोरं जावं लागेल असे सांगितले. आणि यासाठीच गायत्री, सोनाली आणि विकास यांनी उत्कर्ष आणि विशालची नावे घेतली. आणि त्यामुळे त्यांना रात्रभर जागावं लागणार आहे. आणि यामुळेच कुठे ना कुठे विशाल आणि उत्कर्ष यांना झोप अनावर झाल्याचे आजच्या भागामध्ये दिसणार आहे. (बिग बॉस Marathi)

विशाल बाथरूममध्ये झोपला ? हो जय आणि मीरा तिथे गेले असता त्यांना असे आढळून आले विशाल आताच झोपी गेला आणि तो बाहेर आल्यानंतर जयने त्याला तशी विचारणा देखील केली. तर दूसरीकडे उत्कर्षला झोप अनावर झाली आहे, असे निदर्शनास आले आहे. उत्कर्षला गायत्रीने सांगितले झोपू नकोस त्यावर तो गायत्री म्हणाला, हवा टाईट आहे गं…

बघूया पुढे काय होते. पाहा बिग बॉस सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button