राज्यात इमानदार सरकारी कर्मचारी झाले दुर्मीळ | पुढारी

राज्यात इमानदार सरकारी कर्मचारी झाले दुर्मीळ

पुणे : महेंद्र कांबळे : सरकारी कार्यालयांमध्ये लाच दिल्याशिवाय तुमचे काम होत नाहीच. हे वास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आजवर सापळा रचून केलेल्या कारवायांतून समोर आले आहे. लाच नाकारत त्याबाबत तक्रार करणारे इमानदार सरकारी नोकर दुर्मीळ झाले आहेत. पाच वर्षांत राज्यात केवळ 8 सरकारी कर्मचार्‍यांनी लाच स्वीकारण्यास नकार देत संबंधितांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, तर याच कालावधीत लाच घेताना तब्बल 879 सरकारी कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले.

ParamBir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

तहसीलदारांनी केली तक्रार

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदा वाळूउपसा करणार्‍या ट्रकवर कारवाई सुरू केली असताना त्यांना अ‍ॅपद्वारे 50 हजारांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या प्रकरणात लाच देणार्‍या दोघांना एसीबीने बेड्यादेखील ठोकल्या. हडपसर भागातील शेवाळवाडी फाटा परिसरात बेकायदा वाळूउपसा करून निघालेल्या ट्रकवर कोलते आणि पथकाने कारवाई केली होती. त्या वेळी कोलते यांना लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोलते यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर आरोपीने अ‍ॅपद्वारे कोलते यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले. कोलते यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

Shakti Mills Gang Rape : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : सात वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

पुणे विभागात कोल्हापूरचे इमानदार

पुणे विभागात मागील पाच वर्षांत सर्वाधिक चार इमानदार नोकरदार हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील दोन, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक सरकारी कर्मचार्‍याचा नंबर लागतो.

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍ती मिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

या वर्षी आतापर्यंत 129 जणांवर कारवाई

मागील पाच वर्षांत एसीबीने पुणे विभागात सरकारी नोकरदारांविरुद्ध सापळा रचून 839 सरकारी कर्मचार्‍यांना लाच घेताना अटक केली. 2017 मध्ये 187, 2018 मध्ये 200, 2019 मध्ये 184, 2020 मध्ये 139 तर 2021 मध्ये ऑक्टोबरअखेर 129 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

आता ‘ऑनलाइन ट्रान्झॅक्शन’!

सरकारी नोकरदारांना लाच देण्याची प्रकरणे तुलनेने ‘एसीबी’कडे कमी प्रमाणात दाखल झाल्याचे दिसते. बर्‍याच वेळा सरकारी नोकरदारांना लाचेचे आमिष दाखविले जाते. लाच घेतली जात नसेल, तर रोख रक्कम किंवा दागिने स्वरूपातील लाच फाईलमध्ये ठेवली जाते. आता यामध्ये नवीन ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचा वापर होताना दिसतो. त्यामध्ये गुगल पे, फोन पेद्वारे पैसे पाठविले जातात.

पुणे विमानतळ लवकरच 24 तास

तत्काळ तक्रार आवश्यक

बर्‍याच गुन्ह्यांमध्ये असे निष्पन्न झाले आहे, की एखाद्या गुन्ह्यात एखाद्याचा सहभाग निष्पन्न झाला, की समोरच्यांकडून लाच देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या वेळी अशी ऑफर दिली जाते त्या वेळी अशा शासकीय नोकरदाराने तत्काळ एसीबीकडे तक्रार द्यावी लागते. यामध्ये शिक्षेचे स्वरूप लाच घेतल्याप्रमाणेच आहे.

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

‘‘एखाद्या शासकीय अधिकार्‍याकडून त्याच्या अधिकारकक्षेत नसलेले काम करवून घेण्यासाठी संबंधितांकडून लाच देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा एखादे काम लवकर करून देण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा त्या सरकारी अधिकार्‍याला एसीबीकडे तक्रार दाखल दाखल करता येते. त्यासाठी एसीबीकडून चाचपणीही होते. त्यानुसार सरकारी नोकरदाराने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होतो.’’

                                                                                                                        – श्रीहरी पाटील, उपअधीक्षक, एसीबी पुणे.

‘‘नवीन सुधारित कायद्यात लाच देणारा आणि घेणाराही दोषी अशी तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे. प्रामाणिक अधिकार्‍यांना जर लाचेची ऑफर होत असेल, तर त्यांनीही अशा लाच देणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे.’’
                                                                                                                                                       – अ‍ॅड. प्रताप परदेशी

Back to top button