Shilpa Marriage Anniversary : शिल्पाने राज कुंद्रासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली... | पुढारी

Shilpa Marriage Anniversary : शिल्पाने राज कुंद्रासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...

पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला आज २२ नोव्हेंबर रोजी १२ वर्षे पूर्ण झाली. (Shilpa Marriage Anniversary) आजच्या दिवशी २००९ मध्ये शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत सात फेरे घेतले होते. त्यांच्या लग्नाचा आज १२ वा वाढदिवस. (Shilpa Marriage Anniversary) या औचित्याने तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिने राज कुंद्राला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लग्नाला झाली १२ वर्षे

शिल्पाने राजसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोला कॅप्शन लिहिलीय की, १२ वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं की, आम्ही चांगल्या आणि वाईट प्रसंगी एकत्र राहू. सोबत प्रत्येक दिवस. १२ वर्षे आणि मी पुढे मोजत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा …कुकी. आमचा आनंद, हास्य, मुले आणि जीवनाच्या नावे. त्या सर्वांना धन्यवाद जे चांगल्या वाईट काळात आमच्यासोबत राहिले.

या फोटमध्ये शिल्पा वधूवेषात आहे. तर राज कुंद्रानेदेखील मॅचिंग लाल शेरवानी आणि पगडी घातलेली दिसतेय. दोघे एकमेकांना हार घालताना दिसत आहे. एका फोटोमध्ये राज कुंद्रा शिल्पाला सिंदूर लावताना दिसत आहे. तिच्या लग्नाचे फोटो त्यावेळीदेखील व्हायरल होत होते.

राज कुंद्राने पशमीना शॉल विक्रीने आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. आज तो कोटयवधीच्‍या संपत्तीचा मालक आहे. राजने  शिल्पाला लग्नासाठी प्रपोज केले हाेते. यासाठी राजने तिला अनेक महाग गिफ्‍ट दिले होते.

लग्नानंतरदेखील तो शिल्पाच्या आवड-निवडीची काळजी करायचा. त्याने शिल्पाला इम्प्रेस करण्यासाठी आणि तिला पार्टनर बनवण्यासाठी ३ कोटींची रिंग गिफ्ट केली होती.

२०१२ मध्ये ॲनिव्हर्सरीवर राजने शिल्पाला जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलीफामध्ये फ्लॅट गिफ्ट केला होता. हा फ्लॅट १९ व्या मजल्यावर होता. मीडिया रिपोर्टनुसार, या फ्लॅटची किंमत ५० कोटी रुपये आहे.

Back to top button