PUBG Game : इअरफोन लावून पबजी गेम खेळणार्‍या दोघांना रेल्‍वेने चिरडले

PUBG Game : इअरफोन लावून पबजी गेम खेळणार्‍या दोघांना रेल्‍वेने चिरडले

मागील काही वर्षांपासून तरुणाईला वेड लावणारा गेम अशी पबजी गेमची ( PUBG Game ) ओळख आहे. या गेमचे वेड एवढं भयावह आहे की, अनेक तरुणांच्‍या जीवावरही बेतले आहे. अशाच एक धक्‍कादायक घटना मथुरा जिल्‍ह्यातील पार पोलिस ठाणे परिसरात घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कालिंदी कुंज कॉलनीमधील गौरव ( वय १६ ) आणि कपिल ( १८ ) शनिवारी सायंकाळी फिरण्‍यासाठी गेले होते. लक्ष्‍मीनगरजवळ कासगंज – मथुरा रेल्‍वे मार्गावर ते इअरफोन लावून पबजी गेम ( PUBG Game )  खेळत होते. दोघेही गेममध्‍ये इतकी तल्‍लीन झाले की, रेल्‍वेचा येतअसल्‍याचा आवाज त्‍यांना आला नाही. दोघांनाही रेल्‍वे चिरडले. मृतदेहांजवळच मोबाईल सापडले. दोघांचाही मोबाईल फोनवर पबजी गेम सुरु होता, असेही देहातचे पोलिस अधीक्षक श्री चंद्र यांनी सांगितले.

पबजी गेम ( PUBG Game ) खेळत असताना ही दुर्घटना घडली असावा, असा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्‍याचेही श्री चंद्र यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news