डॉक्टर डॉन श्वेता शिंदे हिचा ग्लॅमरस लूक व्हायरल | पुढारी

डॉक्टर डॉन श्वेता शिंदे हिचा ग्लॅमरस लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी मालिकांतील आघाडीची अभिनेत्री श्वेता शिंदे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असेत. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो चर्चेत असतात. श्वेता शिंदे हिने आज इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

तिच्या या हटके लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’ आणि ‘वादळवाट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे

मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे.

अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.

‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देवमाणूस या मालिकांची तिने यशस्वी निर्मिती केली.

हेही वाचलत का?

Back to top button