श्रद्धा कपूर-रणबीर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट येतोय | पुढारी

श्रद्धा कपूर-रणबीर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट येतोय

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ असे सुपरहिट सिनेमे देणारे लव रंजन आपला पुढचा सिनेमा श्रद्धा कपूर-रणबीर यांच्यासोबत करत आहेत. श्रद्धा कपूर-रणबीर हिची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 2023 मध्ये 26 जानेवारीला रिलीज केला जाणार आहे. लव रंजन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पहिल्यांदाच हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत.

याची माहिती देताना निर्मात्यांनी सांगितले, की या कलाकारंच्या अदाकारीने सजलेला हा सिनेमा खास आहे. या सिनेमाचा नवा थिएट्रिकल रिलीज आता समोर आला आहे.

‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन करणारे लव रंजन आपल्या नव्याकोऱ्या सिनेमात दोन्ही कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी रसिकांना देणार आहेत. रणबीर आणि श्रद्धा या सिनेमात रोमॅंन्टिक कॉमेडी करताना दिसतील.

या सिनेमाबाबत श्रद्धाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’वर आपल्या चाहत्यांशी एक मेसेज शेअर करताना लिहिले आहे, ‘ही तारीख तुम्ही मनावर कोरून ठेवा.’

#RanbirKapoor #LuvRanjan #GulshanKumar #BhushanKumar #DimpleKapadia #BoneyKapoor #AnkurGarg #TseriesOfficial #LuvFilms असे हॅशटॅग्जही तिने वापरले आहेत.

सिनेमातील इतर कलाकार

या सिनेमाची कथा आणि इतर कलाकार यांच्याबाबत निर्मात्यांनी काही कळवलेले नाही. निर्मात्यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे. सोबतच अजून एक खास गोष्ट ही, की या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर आणि लव पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button