BBM 3 : त्याचं आणि माझं पण बिनसलं आहे : विशाल | पुढारी

BBM 3 : त्याचं आणि माझं पण बिनसलं आहे : विशाल

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या (BBM3) घरामध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅप्टन्सीची उमेदवारी कोणाला द्यायची. दोन्ही टीममधील प्रत्येक सदस्य एकाच प्रयत्नात आहे की कशी ती उमेदवारी मिळवता येईल. बर्‍याच डील, बरीच भांडण, मारामारी, वादावादी देखील सुरू आहे. आज उत्कर्ष, मीरा, जय तसेच विशाल आणि जय यांचे भन्नाट प्लॅनिंग बघायला मिळणार आहे. (BBM3)

जयचे म्हणणे आहे, विशालला उगाच दिलंस स्नेहाला दिलं पाहिजे होतं. मीराचं म्हणणं आहे. गुगली टाकली त्यांनी. जय म्हणाला, महत्वाचं काय आहे माहिती आहे का? विशाल तरी ऐकेल विकास नाही ऐकणार… उत्कर्षचं यावर म्हणणं पडलं ते म्हणतील एकंचं उमेदवार… दुसरीकडे, जय आणि विशाल यांची चर्चा सुरू आहे ज्यात हे दोघे एकमेकांना डील देत आहेत.

विशाल जयला म्हणाला, मी तुझ्यावेळी नाही हलणार आहे. जय म्हणाला, मला सुध्दा तेच आहे, मी आता तेच सांगितलं. आपण एकमेकांसोबत इतकी डील करू शकतो ना. जय यावर म्हणाला, तो येणार मला माहिती आहे. तो म्हणणार मी नाही बनलो तर. तो उलटा फुटेल मग. मला तू असलास तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, मी कालसुध्दा सोनालीला बोललो. आम्ही विशाल किंवा स्नेहामध्ये एकाला देऊ पण मग नंतर तो अडवाअडवी करेल तर. भरवसा नाही त्याचा. विशाल त्यावर म्हणाला, “त्याचं आणि माझं पण बिनसलं आहे”.

बघूया अखेर कॅप्टन्सीची उमेवारी कोणत्या दोन सदस्यांना मिळणार. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button