धर्म परिषद : गोर बंजारा महाकुंभ धर्म परिषदेची तयारी अंतिम टप्यात | पुढारी

धर्म परिषद : गोर बंजारा महाकुंभ धर्म परिषदेची तयारी अंतिम टप्यात

वाशिम; पुढारी वृत्तसेवा

देशभरातील गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू, साधू संत पुजारी यांच्याकरिता काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे महाकुंभ धर्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित या धर्म परिषदेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे भक्तीधामसह विविध आठ ठिकाणी, गोर बंजारा धाम निर्मितीसाठी पुढाकार घेऊन किसन राठोड यांनी या परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे.

जगद्गुरू संत सेवालाल महाराज व राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीत दि. 21 व 22 नोव्हेंबरला श्रद्धेचा महाकुंभ धर्म परिषद आयोजित केली असून, देशभरातील विविध प्रांतातून सुमारे सातशेच्या आसपास, गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू, साधू, संत व पुजारी उपस्थित राहणार आहेत.

चंदगड ड्रग्ज प्रकरण : मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंसला पोलीसांकडून बेड्या

गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीला माहीत व्हावा यासाठी, यावेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बोली भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, धर्मसत्ता व राजसत्ता मजबूत व्हावी यासाठी हे देशभरातील साधू संत पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. पिठाधिश्वर संत बाबूसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महंत जितेंद्र महाराज यांच्या प्रयत्नातून या परिषदेची अंतिम तयारी सुरू आहे.

Back to top button