Fighter Movie : "फायटर"च्या टीझरची प्रतीक्षा! ऋतिक-अनिलची दमदार ॲक्शन भूमिका | पुढारी

Fighter Movie : "फायटर"च्या टीझरची प्रतीक्षा! ऋतिक-अनिलची दमदार ॲक्शन भूमिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : Marflix ची निर्मिती असलेला या वर्षातील बहुप्रतीक्षित सिनेमॅटिक चित्रपट म्हणजे ‘फायटर’ साठी (Fighter Teaser) आता सगळेच उत्सुक आहेत. हा रोमांचक सिनेमा नक्कीच एक अनोखा अनुभव असणार असून आता त्याच्यासाठी काउंटडाउन सुरू झालं आहे. (Fighter Teaser) “फायटर” या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाचा टीझर उद्या रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या हाय-फ्लाइंग थीमला अनुसरून Marflix ने एक गूढ रेडिओग्राम संदेश दिला, जो चाहत्यांना या चित्रपटाच्या टीझरची झलक देणारा आहे.

संबंधित बातम्या –

या चित्रपटात अनिल कपूर, ऋतिक रोशन दोघेही दमदार ॲक्शन भूमिकेत आहेत. अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंह तर ऋतिक रोशन स्कॉड्रन लिडर शमशेर पठानिया तसेच दीपिका पादुकोण स्कॉड्रन लिडर मिनल राठौड यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

घोषणेची ही कल्पक पद्धत ‘फायटर’ मध्ये असलेल्या नावीन्यपूर्णतेचे उदाहरण आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर या तिघांच्या वैयक्तिक भूमिका पोस्टर मधून बघायला मिळाल्या असून आता सगळ्यांना टीझरबद्दल उत्सुकता आहे. Marflix साठी ” फायटर ” हा नक्कीच खास ठरणार असून त्याच्या टीझर रिलीझ ची वाट बघायला लावणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

Back to top button