'द रेल्वे मॅन' नंतर आर. माधवन सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार? | पुढारी

'द रेल्वे मॅन' नंतर आर. माधवन सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : “द रेल्वे मॅन” या बहुचर्चित वेबसीरिजमधून सगळ्यांची मन जिंकणारा आर. माधवन पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करून तो पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज होत आहे. इंडस्ट्रीतील नव्या चर्चावरून आर माधवन पुन्हा एकदा सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या 

यामध्ये आठ वर्षांनी कंगना राणावतसह त्याच्या हिट रोमँटिक कॉमेडी “तनु वेड्स मनू रिटर्न्स” मधील सहकलाकारासह तो दिसणार आहे. या मिळालेल्या माहितीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर लवकरच या बद्दल अधिकृत घोषणा होणार आहे.

“द रेल्वे मेन” मधील आर. माधवनच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. आर माधवन आगामी शशिकांत यांच्या आगामी क्रिकेट ड्रामा चित्रपट ‘टेस्ट’ मध्ये झळकणार आहे.

Back to top button