Club 52 Movie : हार्दिक जोशीच्या “क्लब 52” चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर पाहिला का? | पुढारी

Club 52 Movie : हार्दिक जोशीच्या "क्लब 52" चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर पाहिला का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. (Club 52 Movie ) अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Club 52 Movie)

संबंधित बातम्या –

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.

“क्लब 52” या चित्रपटाची ‘एक डाव नियतीचा’ अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत. काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ १५ डिसेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

Back to top button