पत्‍नीच्‍या छळप्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्‍यावर गुन्‍हा दाखल | पुढारी

पत्‍नीच्‍या छळप्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्‍यावर गुन्‍हा दाखल

पुणे : पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह मोठ्या धामधुमीत झाला. स्नेहा चव्हाणही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलंय. अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरिक छळ केलाय, अशी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचं तिने फिर्यादीत म्हटलं आहे. अनिकेत याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी स्नेहा विश्वासराव (वय २९, रा. कोथरुड) हिने फिर्याद दिली आहे. तिने फिर्यादित म्हटलं की, अनैतिक संबंध तसेच करिअरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल. या भीतीने मला जीवे मारण्याची धमकी  देण्‍यात आली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हाताने मारहाण करण्यात आली. लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ करण्यात आला.

अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह झाला. स्रेहा चव्हाण याही अभिनेत्री असून त्यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री स्नेहा चव्हाणची आई राधिका चव्हाण या देखील मराठी मालिका अभिनेत्री आहेत. अनिकेत मुळचा मुंबईचा आहे. गेल्‍या काही दिवसांपासून अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण त्यांच्यात वाद सुरू होता,अशी माहिती समोर येत आहे. यानंतंर फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात परतली होती.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Vishwasrao (@aniketvishwasrao)

Back to top button