विलासराव जगताप : ‘विश्वजीत कदमांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लागली’ | पुढारी

विलासराव जगताप : 'विश्वजीत कदमांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लागली'

जत : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांच्या विकासाला वाव देणारी जिल्हा बँक पक्षविरहित असावी. जिल्हाबँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही भावना पालकमंत्री जयंत पाटील ,विशाल पाटील,आ. अनिल बाबर यांची होती. परंतु जिल्हा बँकेची निवडणूक ना. विश्वजित कदम यांच्या आग्रहाखातर लागली आहे. या निवडणुकीत साम, दाम, दंड ची भाषा कदम त्यांच्याकडून नुकतीच जत येथे करण्यात आली आहे .ही भाषा एका मंत्र्याला अशोभनीय आहे. वेळ पडली तरी आम्हीही कमी नाही .पण आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची आहे.आमचे उमेदवार प्रकाश जमदाडे, व तम्मणगौडा रवि पाटील यांचा विजय निश्चित असल्याने मंत्री कदम दादागिरीची भाषा करत आहे. अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केली.

जगताप यांनी जत येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री कदम व आ. सावंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी १ क्रमांकावर तर भाजप दुसऱ्या स्थानी राहील. काँग्रेसला लोक नाकारतील ते तीन नंबर वर राहतील असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेस भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पवार, सद्दामभाई आतार आदी उपस्थित होते.

मंत्री पदावर काम करणाऱ्या नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत

माजी आमदार जगताप म्हणाले जत येथील सहकार विकास पॅनलच्या सभेत विश्वजीत कदम यांनी निवडणुकीत साम, दाम ,दंड वापरण्याचे वक्तव्य केले. वैयक्तिक मंत्री पदावर काम करणाऱ्या नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. मतदारांमध्ये भीती निर्माण करणे. दादागिरी गुंडगिरीची भाषा करून मतदारांना दबावाखाली ठेवण्याचे षड्यंत्र आहे .या षड्यंत्राचा आम्ही निषेध व्यक्त करत आहेत .जर असा प्रकार घडला तर त्याचा मोठा उद्रेक होईल त्याची जबाबदारी मंत्री कदम यांच्यावर राहील असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.
माजी आमदार जगताप म्हणाले, निवडणूका निकोप विचाराने व्हायला हवी. शेतकऱ्यांना संजीवनी असणाऱ्या जिल्हा बँकेत चांगली माणसे निवडून आणण्याचा आमचा उद्देश आहे .मतदार कौल देतात ते मान्य करण्याची मानसिकता असायला हवी .पण काल ज्या प्रकारे काँग्रेसने दादागिरीची भाषा वापरली आहे हे लोकशाहीला घातक व मारक आहे तसं पाहिलं निवडणूकित जशास तसे तसे प्रत्युत्तर मिळत असतात .तर आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीत सामोरे जाऊ व निश्चितपणे आमचे उमेदवार निवडून येणार यात मात्र तिळमात्र शंका नाही परंतु आ. सावंत व मंत्री कदम कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जगताप यांनी दिला.

आ. सावंत यांनी जिल्हा बँकेत केली मनमानी

आ. सावंत यांनी मागच्या पाच वर्षात जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मनमानी कारभार केला आहे .अनेक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला आहे. शेतकऱ्यांना राजकीय द्वेषापोटी वेठीस धरण्याचा प्रकार सावंत यांच्याकडून वारंवार घडलेला आहे. हा प्रकार तालुक्याने पाहिलेला आहे. आठ दिवसात कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची मनमानी पद्धतीने बदली करणे. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे आडवणे .सोसायट्यांना नाहक त्रास देणे .प्रत्येक बाबीत राजकीय द्वेषापोटी भावना ठेवून सावंत यांनी तालुक्यातील सभासदांना शेतकर्‍यांना त्रास दिलेला आहे याची परतफेड तालुक्यातील सुज्ञ मतदार येत्या जिल्हा बँकेत निवडणुकीत करणार आहे .हे मात्र निश्चित आहे सावंत यांच्या राजकीय द्वेषापोटी वागण्याने जनता हैराण झाली आहे. या कारभारातून जनतेला मुक्तता हवी आहे आज तालुक्यात एक वेगळे वातावरण तयार झाला आहे मतदार मोजकेच असले तरी लोकांना बदल हवा आहे असा सूर यापूर्वी कधीच नव्हता तो या निवडणुकीत दिसत आहे. त्यामुळे जत सह जिल्ह्यात आमच्या सात ते आठ जागेवर विजय होणार आहे . यात कसलीच अडचण नसल्याचे माजी आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

ना.जयंत पाटील यांच्यासमोरच मंत्री कदम व आमदार सावंत यांचे शंकास्पद वक्तव्य

मंत्री विश्वजीत कदम व आमदार सावंत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आहे वास्तविक राजकारणात जाहीर आणि निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य करायची नसतात परंतु त्यांनी त्यांच्याच मित्र पक्षावर संशय व्यक्त केला आहे. स्वतःच्या चुकीचे खापर इतरांवर फोडण्याचा केविलवाणा प्रकार मंत्री कदम व सावंत करत आहेत .

हे ही वाचलं का?

Back to top button