केंद्रीय मंत्री Dr. Bhagwat Karad यांनी विमानात वाचवले प्रवाशाचे प्राण

केंद्रीय मंत्री Dr. Bhagwat Karad यांनी विमानात वाचवले प्रवाशाचे प्राण
Published on
Updated on

इंडिगो विमानातून दिल्लीहून मुंबईकडे प्रवास करत असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड Dr. Bhagwat Karad यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचवले. विमानाने उड्डाण घेताच या प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर क्रू मेंबरने आवाहन केल्यानंतर क्षणाचाही वेळ न गमावता डॉ. भागवत यांनी प्रथमोपचार करून त्याला जीवदान दिले.

इंडिगोचे विमान दिल्लीहून मुंबईला निघाले होते. विमानाच्या उड्डाणानंतर एका तासाने एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. यानंतर विमानाच्या केबिन क्रू मेंबरने विमानातत कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली. या विमानातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री Dr. Bhagwat Karad करत होते.

कराड हे व्यवसायाने डॉक्टर आणि सर्जन आहेत, ते क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धावून आले. डॉ. कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले. फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला इंजेक्शन दिले त्यानंतर त्या प्रवाशाला बरे वाटू लागले.

डॉ. कराड यांनी केलेल्या या कामाचे कौतुक सोशल मीडियातून होत आहे. याची दखल कराड यांचे सहकारी आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून घेतली. डॉ. कराड हे माझे सहकारी असल्याचा अभिमान आहे, असे टि्‌वट करून त्यांचे कौतुक केले आहे. इंडिगो एअरलाइन्सनेही ट्विट करत ' आम्ही तुमचे हार्दिक आभार मानतो. तुम्ही तुमच्या कर्तव्याप्रति नेहमीच जागरुक असता. आम्ही केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कामाची प्रशंसा करतो. डॉ. भागवत कराड यांनी सहप्रवाशाची मदत केली, ही कृती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.'

केंद्रीय मंत्री म्हणून Dr. Bhagwat Karad प्रोटोकॉल तोडून त्यांनी हे कार्य केले. मात्र, त्यांची ही कृती तेथील प्रवाशांना भावली. उपचार करतानाचा फोटो काही वेळाने व्हायरल झाला.

जुलै, २०२१ मधील मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थमंत्रिपदाची संधी दिली. मुळचे औरंगाबादचे असलेले कराड हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news