Sakshi Malik : ‘बम डीगी-डीगी’ फेम अभिनेत्रीचा कलरफूल बिकिनीतील अंदाज व्हायरल

Sakshi Malik : ‘बम डीगी-डीगी’ फेम अभिनेत्रीचा कलरफूल बिकिनीतील अंदाज व्हायरल
Published on
Updated on

चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' मधील 'बम डीगी-डीगी बम बम' या गाण्यातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल झालाय. ही अभिनेत्री आहे-साक्षी मलिक. (Sakshi Malik). ती एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. साक्षी मलिक (Sakshi Malik) ने नव्या अंदाजात व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. इन्स्टाग्रामवर साक्षी मालिक नेहमी आपल्या फोटोजमुळे चर्चेत राहते.

तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती समुद्रात उभी असलेली दाखवलीय. ती बिकिनीमध्ये पोज देताना दिसतेय. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिलीय की-'What I eat in a day' is OUT NOW on my Youtube channel ❤️. पण या कॅप्शननंतर एका युजरने तिला प्रतिप्रश्न विचारलाय की-What is the connection between eating in a day and a video in a bikini.

चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' मधील 'Bom Diggy Diggy' या गाण्यातून ती लोकप्रिय ठरली होती. साक्षीचे इन्स्टाग्रामवर ६.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

साक्षी यांचा जन्म २२ जानेवारी, १९९३ रोजी कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईत आली. अनेक कंपनी आणि ब्रँडसाठी तिने टीव्ही जाहिराती आणि मॉडलिंग केलं. पुढे बॉलिवूडमध्ये साक्षीने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातून सुरूवात केली होती. तसेच ती अरमान मलिकच्या "वेहम" या संगीत व्हिडिओमध्ये दिसली होती.

या वादामुळे आली होती चर्चेत

२०२० मध्ये तेलुगु चित्रपट "व्ही" मध्ये एक सेक्स वर्कर म्हणून तिचा फोटो दाखवण्य़ात आला होता. तो फोटो तिच्य़ा परवानगी शिवाय दाखवण्यात आला होता. म्हणून तिने मुंबई हायकोर्टात गेली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर या चित्रपटातील तिचा सीन हटवण्यात आला होता.

साक्षीने तिच्या परवानगी शिवाय तिचा फोटो चित्रपटात वापरण्यात आल्याने मानहानीची केस दाखल केली होती. कोर्टाने सुनावणी करत म्हटले होते की, या मॉडलच्या फोटोचा वापर चुकीच्या पध्दतीने झाला आहे.

त्याचबरोबर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले होते. तिचा तेलुगु चित्रपट व्ही अॅमेझॉनवर ५ सप्टेंबर, २०२० रोजी रिलीज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news