sonali Khare : सोनाली खरेचा रेड बिकीनी अवतार ! अमृता खानविलकरची सुद्धा हटके कमेंट (video) | पुढारी

sonali Khare : सोनाली खरेचा रेड बिकीनी अवतार ! अमृता खानविलकरची सुद्धा हटके कमेंट (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमठवलेली गुणी अभिनेत्री सोनाली खरे (sonali Khare) गेल्या दोन दशकांपासून आपले अधिराज्य गाजवत आहे. सोनाली खरेची पुन्हा नव्याने चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिमाखात पर्दापण केलं आहे.

सोनाली खरेनं (sonali Khare) कलर्स मराठी वाहिनीवरील आज काय स्पेशल या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वीकारून चाहत्यांना गोड भेट दिली आहे. सोनाली तब्बल आठ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकत आहे. दरम्यान सर्वच सेलिब्रेटींचे परफेक्ट व्हेकेशन लोकेशन असलेल्या मालदीवमधील एक थ्रोबॅक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सोनालीने (sonali Khare) तिने रेड बिकीनीमध्ये आपला कुल अंदाज दाखवला आहे. तिचा बिकीनी अवतार चाहतेही चांगल्याच कमेंट करत आहेत. आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरने सुद्धा तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. अमृताने Ohhhh sexaaayyyy baby अशी प्रतिक्रिया तिच्या बिकीनी लुकला दिली आहे. आदिनाथने Ufffff म्हणून प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare)

सोनाली सातत्याने फिटनेस तसेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियात पोस्ट करत असते.

सोनालीने अभिनेता बिजय आनंदसोबत लग्न केलं असून तिला एक मुलगी आहे. तिचे नाव सनाया आहे.

Back to top button