कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : इचलकरंजी केंद्रस्थानी | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : इचलकरंजी केंद्रस्थानी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येमुळे इचलकरंजी राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. प्लस व मायनस याचे आडाखे बांधतानाच नेत्यांकडूनही सावध पावले टाकण्यात येत आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी इचलकरंजी मतदारांच्या भेटीगाठीसाठी तळ ठोकला होता. दरम्यान, अमल महाडिक व त्यांच्या समर्थकांकडूनही शहरात हालचाली सुरू असून आ. प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अन्य भाजप मित्रपक्षांशी संपर्क साधण्यात येत आहे. जि.प. सदस्य राहुल आवाडे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

इचलकरंजीत काँग्रेसचे 19 नगरसेवक असून त्यापैकी आवाडे समर्थक 14, भाजपचे 16, राजर्षी शाहू आघाडी (कारंडे गट) 11, राष्ट्रवादीतील जांभळे गटाचे 8, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे 13 नगरसेवक तर शिवसेनेच्या एक नगरसेविका आहेत.

नगरसेविका शोभा कांबळे यांचे निधन झाले आहे तर ताराराणी आघाडीचे नगरसेवक संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे फरार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजप व आवाडे समर्थक सदस्य सतेज पाटील यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे चाळके यांची ताराराणी आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींसह अन्य काही अपक्ष सतेज पाटील यांना समर्थन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या बलाबलानुसार दोन्हीही उमेदवारांना समसमान पाठिंबा मिळताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ 

भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!!

Back to top button