माझी तुझी रेशीमगाठ मधील चिमुकल्या परीच्या कुटुंबावर शोककळा.. | पुढारी

माझी तुझी रेशीमगाठ मधील चिमुकल्या परीच्या कुटुंबावर शोककळा..

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ ही चिमुकल्या अभिनेत्रीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. पण मायराच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. परी म्हणून ओळखली जाणाऱ्या मायराच्या आजोबा आणि मायराची आई म्हणजेच श्वेता वायकुळ यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. श्वेता यांनी वडिलांसोबतच्या एका आठवणीवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे परी म्हणजेच मायर घराघरात पोहचली पण त्या आधी देखील तिच्या यु ट्यूब चायनलमुळे ती सर्वपरिचित होतीच. आता ह्या मालिकेतून तिच्या अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत.

श्वेता वायकुळ यांची भावनिक पोस्ट

परी अर्थात मायराची आई श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यांनी लिहियलंय की, पप्पा तुमच्यामुळे मला ही दुनिया कळली. तुमच्यामुळे मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली. कधीही सोडली नाही तुम्ही माझी साथ का सोडून गेलात आज, तुम्हीच होता माझ्या जीवनाचा आधार. मायराचे कौतुक जेव्हा तुमच्या डोळ्यात दिसले तेव्हा खूप प्रसन्न वाटले मला. का थांबला नाहीत तिचं अजून कौतुक करायला. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे, माझ्या जगण्याला अर्थ आहे केवळ तुमच्यामुळे, माहिती नाही तुमच्याशिवाय मी पुढचं आयुष्य कसं जगेल, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कॉल करून विचारायची प्रत्येक सुखात तुम्ही माझ्या सोबत होता. तुमच्या शिवाय कसं सामोरे जाऊ प्रत्येक गोष्टीला काहीच कळत नाही. कोण येईल माझ्या एका कॉल वर मला भेटायला. खूप खूप आठवण येते पप्पा. का गेलात तुम्ही? तुमच्या शिवाय जगायची सवय नाही हो मला. अचानक निघून गेलात. बरचं काही बोलायचं राहून गेलं. स्वतःची काळजी न करता इतरांसाठी जगत राहिलात. नेहमी सकारात्मक, प्रसन्न असायचा तुम्ही आणि तेच आम्हाला हि शिकवल तुम्ही. तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

माझ्या प्रत्येक कामात विचारात स्वासात तुम्ही आहेत. माहित आहे तुम्ही परत नाही येनारपण माझ्या प्रत्येक गोष्टीत माझे बाबा आहेत. तुमचा प्रत्येक गुण माझ्या मायरा मध्ये आहे आणि त्याचा खूप अभिमान आहे मला. आम्हाला कसलीच कधी कमी पडू दिली नाही तुम्ही. १५ दिवस कसे काढले तुमच्या शिवाय कस सांगू तुम्हाला.. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते Papa….Miss You Papa Forever. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे परी म्हणजेच मायर घराघरात पोहचली पण त्या आधी देखील तिच्या यु ट्यूब चायनलमुळे ती सर्वपरिचित होतीच. आता ह्या मालिकेतून तिच्या अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच सोशिअल मीडिया अकाउंट देखील तिची आईच सांभाळत असताना पाहायला मिळते. फारच कमी दिवसात मायराला खूप प्रसिद्धी मिळाली ह्यात तिच्या घरच्यांनी तिच्यातील खास गोष्ट जाणून घेतली त्यामुळेच तिला आज यश मिळालेले पाहायला मिळते. असो मायरा आणि तिच्या कुटुंबावर आलेल्या ह्या वाईट प्रसंगातून सर्व कुटुंब लवकर सावरून पुन्हा सर्व काही सुरळीत होईल अशी आशा आहे. परीच्या म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या आजोबाना भावपूर्ण श्रद्धांजली.

झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही मालिका अल्पावधीतच टीआरपीच्या क्षेत्रातही अव्वलस्थानी असल्याचे चर्चिले जाते.

या मालिकेतील सर्व पात्र हे अभिनयानं या दृष्टीने पाहिले तर अनुभवी आहेत. त्यामुळे ही मालिका कमी वेळात अव्वल स्थानी आहे. यशची भूमिका श्रेयस तळपदे करत आहे, तर मालिकेत मोहन जोशी आजोबाच्या भूमिकेत असून समीर म्हणजेच संकर्षण कराडे यशचा मित्र आहे.

नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे करत आहे. असे एकूण सर्वच अनुभवी कलाकार या मालिकेत असल्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. या मालिकेत परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

Back to top button