लिटिल चॅम्प्स : उषा मंगेशकर म्हणाल्या- लता दीदी हा एपिसोड बघ | पुढारी

लिटिल चॅम्प्स : उषा मंगेशकर म्हणाल्या- लता दीदी हा एपिसोड बघ

पुढारी ऑनलाईन :

सारेगमप लिटिल चॅम्प्स शोच्या नवीन पर्वाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर हजेरी लावणार आहे.

त्यांनी सर्व चॅम्प्सच कौतुकच केलं नाही तर लता दीदींना हा एपिसोड पाहण्याची विनंती देखील केली. उषा मंगेशकर यांच्यासोबतच माईंड रीडर केदार परुळेकर देखील या मंचावर उपस्थित असतील. उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले. या आठवड्यात कोणाला गोल्डन तिकीट मिळणार? कोण हा मंच सोडून जाणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तेव्हा पाहा- सारेगमप लिटिल चॅम्प्स  गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

Back to top button