ED remand : अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ | पुढारी

ED remand : अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाॅंड्रिंगप्रकरणी ईडी कोठडीत (ED remand) आणखी ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ही कोठडी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात १ नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहिल्यानंतर १२ तास चौकशी करण्यात आली होती. शेवटी १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. देशमुखांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयने त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील त्यांच्यावर मनी लाॅंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल केल्यानंतर देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी (ED remand) सुनावली होती.

रामदास आठवले यांनी घेतला मजेदार उखाणा, बांदेकर भाओजी हसून लोटपोट

अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. हृषिकेश यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. पण, जामिनाबाबत केलेल्या अर्जात असे म्हटले होते की, “अनिल देशमुख यांची १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आली. त्यामुळे माझ्याही बाबतीत असे होईल”, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

पहा व्हिडिओ : गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव 

हे वाचलंत का? 

Back to top button