Fire : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं आगीत होरपळून दहा जनावरांचा मृत्यू | पुढारी

Fire : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं आगीत होरपळून दहा जनावरांचा मृत्यू

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्यातील पानकनेरगाव येथे रात्री एका गोठ्यात लागलेल्या आगीत (Fire) दहा जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी (Fire) शर्यतीचे प्रयत्न केले. परंतु आग एवढी भीषण होती की, जवळ जाणे देखील शक्य नव्हते.

काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सचिन बोलवार यांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत चार म्हैशी, दोन गिर गाई, दोन बैल, दोन वासरे, एक कुत्रा यासह गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य व सोयाबीनची काही पोती या आगीत भस्मसात झाली. यामध्ये एकूण अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय व्यक्त करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सदर घटनेची पोलीसांनी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा :

व्हिडिओ पहा :

Back to top button