रामदास आठवले यांनी घेतला मजेदार उखाणा, बांदेकर भाओजी हसून लोटपोट | पुढारी

रामदास आठवले यांनी घेतला मजेदार उखाणा, बांदेकर भाओजी हसून लोटपोट

पुढारी ऑनलाईन :

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या सौ होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणार असून हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रामदास आठवले आले, की त्यांनी काहीतरी चारोळी साजर करणं अपेक्षितच आहे तसेच आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. शीघ्रकवी असलेल्या आठवले यांनी असाच एक मजेदार उखाणा कार्यक्रमात घेतला.

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आणि महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा अत्यंत आवडता आहे.

गेली १७ वर्ष हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठिणी देऊन सन्मान आणि कौतुक करतोय. सध्या दिवाळी विशेष भागांमध्ये काही खास पाहुणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असंच एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांची सौ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बांदेकर भाओजींनी लग्नाची तारीख विचारली असताना आठवले यांनी स्वतःच्या अंदाजात उखाणा घेतला – ‘माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा’. त्यांचा हा मजेदार उखाणा ऐकून बांदेकर भाओजींसोबत सगळेच हसून लोटपोट झाले.
हा भाग १२ आणि १३ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. होम मिनिस्टरचा हा विशेष भाग पाहायला विसरू नका संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

Back to top button