पुणे महानगर नियोजन समिती च्या निवडणुकीत काँग्रेसला धक्‍का; नागरी गटातील एकमेव उमेदवार पराभूत | पुढारी

पुणे महानगर नियोजन समिती च्या निवडणुकीत काँग्रेसला धक्‍का; नागरी गटातील एकमेव उमेदवार पराभूत

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत नागरी गटातून काँग्रेसच्या एकमेव उमेदवार चंदूशेठ कदम यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न करता उमेदवार उभा करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडला होता.

पुणे महानगर नियोजन समितीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 23 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संख्या व अतिरिक्त संख्याबळ पाहता या 22 जागामध्ये राष्ट्रवादीचे 7, भाजपचे 14 आणि शिवसेनेचा 1 सदस्य मतांच्या कोटयानुसार निवडून जाणार हे अपेक्षित होते.

पिंपरीत काँग्रेसचे 0 नगरसेवक आहेत. पुण्यात 10 सदस्य आहेत. तर निवडून येण्याचा कोटा 13 मतांचा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी गटातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्‍यांनी ग्रामीण गटातून जिल्ह्यात काँग्रेसला एक जागा देऊ केली केली होती. मात्र, काँग्रेसच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांचा हा प्रस्ताव धुडकावून नगरसेवक चंदूशेठ कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती. त्यावरून महाविकास आघाडीत थेट फूट पडली होती.

त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोणाला धक्का बसणार याबाबत उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस उमेदवार या निवडणुकीत पराभव झाला असून या निकालाचे थेट परिणाम महापालिका निवडणुकीतील आघाडीवर होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीमध्ये ग्रामीण क्षेत्रातील 7 जागांपैकी 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये बाजी मारली आहे.

त्यामध्ये प्रियांका पठारे आणि वसंत भसे हे निवडून आले आहेत. तर छोटे नागरी क्षेत्र म्हणजेच नगरपालिकामधून एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भेगडे विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवार
१) अविनाश साळवे – शिवसेना
२) दिलीप बाराटे – राष्ट्रवादी
३) राजेंद्र शिळीमकर – भाजप
४) मंगला मंत्री –
५) मोरेश्वर भोंडवे – राष्ट्रवादी
६) राणी भोसले – भाजप
७) वसंत बोराटे- भाजप
८) वैशाली बनकर – राष्ट्रवादी
९) चंद्रकांत नखाते – भाजप
१०) सचिन दोडके – राष्ट्रवादी
११) किरण दगडे – भाजप
१२) नामदेव डाके – भाजप
१३) अनिल टिंगरे –
१४) बाबुराव चांदेरे – राष्ट्रवादी
१५)प्रवीण चोरबेले – भाजप
१६) हरिदास चरवड – भाजप
१७) वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी
१८) जयश्री गावडे – भाजप
१९) निर्मला गायकवाड – भाजप
२०) अजित गव्हाणे – राष्ट्रवादी
२१) ज्योती कळमकर –
२२) संदीप कस्पटे -भाजप

पुणे महानगर नियोजन समितीच्या सर्व तीस जागांचा निकाल जाहीर..
भाजप -16
राष्ट्रवादी काँग्रेस -12
शिवसेना -1
अपक्ष-1

मोठे महानगर क्षेत्र एकूण जाागा- 22
भाजप -14
राष्ट्रवादी काँग्रेस -7
शिवसेना-1

छोटे महानगर क्षेत्र (नगरपालिका) एकूण जागा-1
राष्ट्रवादी काँग्रेस -1

ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र एकूण जागा 7
राष्ट्रवादी काँग्रेस -4
भाजपा -2
अपक्ष -1

Back to top button