Harleen sethi : विकिच्या लग्नात मला ओढू नका? विकीची एक्स गर्लफ्रेंड म्हणाली.... | पुढारी

Harleen sethi : विकिच्या लग्नात मला ओढू नका? विकीची एक्स गर्लफ्रेंड म्हणाली....

पुढारी ऑनलाईन :

सध्या सोशल मीडियावर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे क्यूट कपल डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, या दोघांच्यामध्ये चर्चा होतेय ती विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची. विकी-कॅटरिनाच्या लग्नामध्ये हरलीन सेठी हिचं नाव चर्चेत आलं आहे. जेव्हा विकी-कॅटच्या लग्नावर तिला विचारण्यात आले. तेव्हा हरलीन सेठी काय म्हणाली पाहा.

हरलीन म्हणाली- कॅट-विकिच्या लग्नात मला ओढू नका. विकीने नात्यातील रंग अचानक बदलला. त्यामुळेच आमचे ब्रेकअप झाले. ‘संजू’ आणि ‘उरी’च्या यशानंतर विकी पूर्णपणे बदलला. पण ही सर्व भूतकाळातील गोष्ट आहे.

अनेकदा हरलीनच्या मैत्रिणीदेखील तिला विकी-कॅटच्या लग्नाविषयी प्रश्न विचारतात. पण, तिने स्पष्टपणे सांगितलंय, मला त्यात ओढू नका.

हरलीन सध्या खूप बिझी आहे. ती एकता कपूरच्या ‘द टेस्ट केस २’ बद्दल खूप उत्सुक आहे. याच्या दुसऱ्या भागाचे कथानक तिच्याभोवती फिरणारा आहे. तर पहिला भाग निम्रत कौरच्या भोवती फिरणारा आहे.

तिने अलीकडेच एका चित्रपटातील गाण्यासाठी शूट केले. ती आणखी एका वेब शोमुळे चर्चेत आहे, असं मीडिया रिपोर्टनुसार समजतं.

तिचा २३ जून, १९९२ रोजी मुंबई येथे जन्म झाला. Jankidevi Public School मधून तिचे शालेय शिक्षण झाले. मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. पुढे तिने एमबीए मधून शिक्षण घेतले.

तिने स्टार प्लसवरील टीव्ही सीरीज गुलमोहर ग्रँड (२०१५) मधून डेब्यू केला होता. ती अल्ट बालाजीच्या ब्रोकन बट ब्युटिफूल या वेबसीरीजमध्येही झळकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi)

Back to top button