अभिनेत्री कंगना रनौतकडून पद्मश्री पुरस्कार परत घेऊन तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या कंगना रनौतवर मल्लिकांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले-एका चित्रपट अभिनेत्रीला पद्मश्री देऊन पुढे करण्यात आलं आहे. अभिनेत्री स्वातंत्र्यावर बोलल्या. खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले. हे त्यांचे आक्षेपार्ह विधान आहे. हे वक्तव्य म्हणजे लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
मलिक पुढे म्हणाले की मालकाला खूश करण्याचा प्रयत्न ईडीकडू सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अफवा पसरवू नये. कालपासून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. वफ्फ बोर्डात स्वच्छता मोहिम आम्ही सुरू केलीय. नवाब मलिक कुणालाही घाबरणार नाही. वफ्फ बोर्डाच्या जमिनीवरून अफवा पसरवल्या जात आहेत.
मलिक पुढे म्हणाले की भाजपच्या मंत्र्यांनी मंदिराच्या नावाखाली जमिनी हडपल्या. कुठल्याही कारवाईला मी घाबरणार नाही. चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा.
टाईम्स नाऊ समिट २०२१ मध्ये कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. तिच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री स्वरा भास्करपासून ते माजी आयएएस आणि अनेक काँग्रेस नेते भाजप आणि कंगनावर भडकले आहेत. या इव्हेंटमध्ये कंगनाने म्हटले की, १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले. कंगना तिच्या वक्तव्यात म्हणाली की, 'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडेल, पण हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचे रक्त सांडू नये हेही लक्षात ठेवावं लागेल. त्यांनी अर्थातच स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, भिक होती. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ मध्ये मिळाले.