बिग बॉस मराठी : उत्कर्ष याचा निर्णय काय असेल? | पुढारी

बिग बॉस मराठी : उत्कर्ष याचा निर्णय काय असेल?

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच. कॅप्टन्सी कार्याची वाट घरामध्ये प्रत्येक सदस्य बघत असतो… कारण, यातूनच घराला मिळतो नवा कॅप्टन, आता या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला काय गमवावं लागणार आहे? सदस्य ते करण्यास तयार होतील ? हे कळेलच आजच्या भागामध्ये. पण, उत्कर्ष याचा निर्णय काय असेल? उत्कर्ष नव्या टास्कमधून बाहेर होईल का?

बिग बॉस मराठी सिझनच्या आजसमोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले. “उत्कर्ष कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आणि ती गोष्ट आहे… हे सांगताच जयला अश्रू अनावर झाले. असं काय आहे जे उत्कर्षला गमवावं लागणार आहे? उत्कर्ष जयसाठी तयार होईल? काय असेल त्याचा निर्णय…

जाणून घेण्यासाठी पहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button