बिग बॉस मराठी : नक्की मीराला काय झालं? | पुढारी

बिग बॉस मराठी : नक्की मीराला काय झालं?

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये असं काही ना काही घडतं असतं ज्यामुळे सदस्यांचा संयम तुटतो. काही गोष्टी त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात. असंच काहीसं मीराच्या बाबतीत झालं आहे असं दिसून येतं आहे. बिग बॉस मराठी 3 मध्ये मीरा आणि सोनालीमध्ये नक्की असे काय घडले ज्यामुळे मीराचा बांध तुटला.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मीरा आणि सोनाली एकमेकींवर ओरडताना दिसत आहेत. मीरा म्हणते आहे, जेव्हा काम करायचे असते तेव्हा ही आजारी असते. सोनाली त्यावर म्हणाली, डोक्यावरच बसते ही काय करू मी? वेडी आहेस का तू… मीरा म्हणाली, मी डोक्यावर बसले आहे? कालपासून ऐकते आहे मी. कालपासून.. सहन करते आहे याचा अर्थ असा नाही काही बोलेल  ती. सोनाली म्हणाली, प्रत्येकवेळेसचं आहे हीच… आणि मीरा अचानक आपटाआपटी करू लागली.

नक्की सोनालीने असं काय केले? बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button