बिग बॉस मराठी : आपण त्याच्या बाटलीमध्ये उतरायचे नाही - सोनाली | पुढारी

बिग बॉस मराठी : आपण त्याच्या बाटलीमध्ये उतरायचे नाही - सोनाली

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये विकासबद्दल चांगलचं गॉसिपींग सुरू आहे. सहसा विकासबद्दल कोणी काही बोलतं आहे हे कमीच बघायला मिळतं. कारण बहुतांशी तोच बोलताना दिसतो. विकासच्या ग्रुपमधील सोनाली पाटील आणि मीनल त्याच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. तुम्हालाही वाटतं का विकास समोरच्याला बाटलीत उतरवतो? पण, सोनाली म्हणतो-आपण त्याच्या बाटलीमध्ये उतरायचे नाही.

मीनल सोनाला सांगताना दिसणार आहे, मी कितीवेळा म्हणाले तिकडे एकेकाने बोला, ट्राय करा, प्र्त्येकाशी मुद्देसूद बोला. जे विकासने केलं. सगळे मुद्दे बरोबर नाही बोला तो पण त्याने… तुला माहिती आहे ना तो बोलण्यामध्ये उतरवतो समोरच्याला बाटलीमध्ये तसं तो करत होता.

सोनाचे म्हणणे पडले, माझं काय मत आहे माहिती आहे त्याचं बाटलीमध्ये उतरवणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण आपण बाटलीमध्ये त्याच्या उतरायचे नाही ही तर गोष्ट खरी आहे. काल बोलता बोलता तू बोलीस तू त्याचा जो प्लस पॉइंट आहे तो आपण आपल्यासाठी कसा प्लस करू शकतो वेळ आल्यावर आपल्यासाठी मायनस कसा होऊ शकतो.

दोघींच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या. बघूया अजून पुढे काय काय त्यांनी मते मांडली. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button