‘फुलराणी’ : विक्रम राजाध्यक्षाच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे

‘फुलराणी’ : विक्रम राजाध्यक्षाच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे
Published on
Updated on

आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी आणि वेगवेगळ्या भूमिकांसाठी अभिनेता सुबोध भावे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या कलाकृतीची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. सुबोध भावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'फुलराणी' या चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यात आला. यात 'विक्रम राजाध्यक्ष' ही मुख्य भूमिका सुबोध भावे साकारणार आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या कृष्णधवल मोशन पोस्टरवर त्यांचा 'हटके' लूक पहायला मिळतोय. यात अभिनेता सुबोध भावे सोबत पाठमोरी 'फुलराणी' पहायला मिळते आहे.

'प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख दिली. चौकटीपलीकडच्या भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. 'फुलराणी' चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशींनी मला ऐकवली, तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी लगेचच त्यांना होकार दिला', अशी प्रतिक्रिया सुबोधने व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या कठीण काळात सर्व नियमांचे पालन करुन 'फुलराणी' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली 'माय फेअर लेडी' ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच 'पिग्मॅलिअन' कलाकृतीने प्रेरित होऊन 'फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर लवकरच साकारणार आहे.

नटसम्राट, 'What's up लग्न' हे दर्जेदार यशस्वी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ह्यांच्या दिग्दर्शनाखाली 'फुलराणी' ही कलाकृती चित्रपटरूपात साकारत आहे.

'फिनक्राफ्ट मिडिया' या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे.गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.

सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.फुलराणीची भूमिका कोण साकारणार? आणि इतर कलाकार कोण आहेत? हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन जोरात सुरू आहे.  उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा मनमोहक सुगंध २०२२ ला चित्रपटगृहात दरवळणार आहे. 'फुलराणी' प्रेक्षकांनाही मोहित करेल, असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news