Sunny Leone : सनी लिओनी चं ‘मेरा पिया घर आया २.०’ प्रेक्षकांच्या भेटीला

Sunny Leone
Sunny Leone

पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone ) तिच्या अनेक कलागुणांसाठी ओळखली जाते. अभिनय आणि नृत्य अशा अनेक गोष्टी मधून ती कायम चर्चेत असते. दरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. सनीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेरा पिया घर आया २.०' ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. संगीत जगाला एक अनोखं स्थान निर्माण झालं आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्यावर चित्रित केलेल्या आयकॉनिक ट्रॅकच्या नव्याकोऱ्या म्युझिक व्हर्जनने रसिकांची मने जिंकली आहेत. सनी लिओनीच्या ( Sunny Leone ) या गाण्याच्या टीझरने बरीच चर्चा निर्माण केली होती आणि आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. 'मेरा पिया घर आया २.०' क्लासिकला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. चाहत्यांना सनी लिओनीच्या नव्या क्लासिक ट्रॅकवर प्रेम आहे. कारण तिची प्रतिभा या एकूण बॅंजरमध्ये चमकत आहे. 'केनेडी' मध्ये तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाल्यानंतर ती 'कोटेशन गँग'सोबत तमिळ चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

माधुरी दीक्षितच्या नृत्यकौशल्याची चाहती असलेल्या सनीने तिच्या आगामी प्रकल्पासाठी आपला उत्साह व्यक्त केल्‌ आहे. यावेळी तिने म्हटले आहे की, 'माधुरी दीक्षित माझ्या करिअरसाठी सतत प्रेरणास्त्रोत आहे. जेव्हा -जेव्हा मी माझी स्वतःची गाणी सादर करते तेव्हा त्याच्या कौशल्याची आठवण काढते. त्याच्या कौशल्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवते. विजयने कोरिओग्राफी परिपूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि या आयकॉनिक डान्ससाठी खूप उत्सुक आहे. माझी स्वप्नपूर्ती झाली असून आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असल्याने उत्सुकता वाढली आहे'. असेही तिने म्हटलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news