Tiku Weds Sheru : कोण आहे बोल्ड अवनीत कौर? | पुढारी

Tiku Weds Sheru : कोण आहे बोल्ड अवनीत कौर?

मुंबई; पुढारी ऑनलाईन:  बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अवनीत कौर यांचा आगामी ‘टीकू वेड्स शेरू’ ( Tiku Weds Sheru) हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील नेहमीचं चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटाचे सलग तीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात खास करून ‘टीकू’ची भूमिका साकारणारी अवनीत कौर कोण आहे हे जाणून घेवूयात…

कोण आहे अवनीत कौर?

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील हँड वॉशच्या जाहिरातीत दिसलेली अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अवनीतला अनेक टीव्ही शोमध्ये बालकलाकार म्हणून पाहिले गेले आहे. ‘अलादीन नाम तो सुना होगा’ यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.

अवनीतचा जन्म १६ ऑक्टोबर २००१ रोजी जालंधर, पंजाबमध्ये झाला. अवनीतनं आपल्या करिअरची सुरुवात ‘डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स’ या शोमधून केली. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. अवनीतने सध्या आपल्या करिअरला चार चॉंद लावले आहेत.

अवनीत नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना भारावून सोडले आहे. अननीतचे सोशल मीडियावर २६ दशलक्षहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या अवनीतचा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा आगामी ‘टीकू वेड्स शेरू’ ( Tiku Weds Sheru ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगणा राणावतने सलग तीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर झालेल्या तीनपैकी एका पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आणि अवनीत एकत्रीत दिसत आहेत. तर आणखी दोन पोस्टरमध्ये नवाज आणि अवनीत वेगवेगळे दिसत आहेत. या चित्रपटात शेरूची भूमिका नवाजुद्दीन तर टीकूची भूमिका अवनीत साकारत आहेत. या पोस्टरमध्ये अवनीत लाल रंगाचा शिमरी ड्रेस तर नवाजुद्दीनने ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली आहे. या लूकमध्ये दोघेही खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.

नवाजुद्दीनचे पोस्टर रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा आपण भेटतो तेव्हा मनातून भेटतो, नाहीतर स्वप्नातही भेटणे मुश्कील. शिराज खान अफगानी उर्फ ​​शेरूला भेटा.’ तर अवनीतचे पोस्टर रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चलो तो चाँद तक, नाही तो शाम तक. भेटा तस्लीम खान उर्फ ​​टिकूला.’

याशिवाय दोघांच्या एकत्रित तिसऱ्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कह दिया तो कह दिया ….’ असे लिहिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर तर निर्मिती कंगना राणावत करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार असल्याने चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

Back to top button