बिग बॉस मराठी : कोण आहे बिच्छू गँग? - पुढारी

बिग बॉस मराठी : कोण आहे बिच्छू गँग?

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाती बदलताना दिसतं आहेत हे मात्र नक्की! मीनल आणि विकासच्या मैत्रीमध्ये सुध्दा आता दुरावा येणार का? असं कुठेतरी विकासच्या बोलण्यावरून वाटतं आहे. घरामध्ये कोण आहे बिच्छू गँग ज्याबद्दल विकास सोनालीशी बोलताना दिसणार आहे? काल विशाल निकमला चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमध्ये त्याच्या फनने सोनालीबद्दल चुगली केली. ज्याचे विशालला जरा वाईट वाटले. पण, म्हणता म्हणता सोनाली नाही तर मीनलचं त्या ग्रुपसोबत जाऊन गप्पा मारताना दिसणार आहे. नक्की कशाचे विकासला वाईट वाटले आहे? मीनलने खरंचं तिचा गेम सुरू केला आहे का? नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात हळूहळू कळेलच. पण, नेमकी बिच्छू गँग कोण आहे?

विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, हा हा हू हू चालू आहे मीनलचं… गॅंग बरोबर. सोनालीचे म्हणणे आहे, तिने तिचा गेम चालू केला असं असेल. तुला बोली नाही का, सगळ्या गोष्टी. विकास पुढे म्हणाला, एन्जॉय करूया असं म्हणाली याचा अर्थ हा होतो हे मला नव्हतं माहिती.

सोनाली त्यावर त्याला म्हणाली, तू पण जाऊन बसतोस की ? त्यावर विकास म्हणाला, असा ? इतका वेळ?… आणि मी बसतं नाही, लोकं माझ्याकडे येतात. हा फरक आहे…. कळलं…

बघूया काय होतं पुढे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button