

सान्या मल्होत्राचा सध्या मीनाक्षी सुंदरेश्वर हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळतोय. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालाय. काही दिवसांपूर्वी, या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यावेळी सोशल मीडिया युजर्सनी या टीझरवर टीका केली होती. टीझरमध्ये दाखवण्यात आलं होतं की, सान्या एक चुलबुली टाईपची मुलगी आहे. तिचा प्रियकर अभिनन्यू तोडा लाजाळू आणि इंजिनिअर आहे. लग्नानंतर तो नोकरीसाठी बाहेर निघून जातात.
मुलाचे नाव सुंदरेश्वर आणि मुलगीचे नाव मीनाक्षी आहे. मीनाक्षी सुंदरेश्वर, दक्षिण भारतातील सर्वात मोठं आणि प्रसिध्द मंदिर आहे. (मदुराईतील हे मंदिर आहे.)
एका बैठकीत मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांच लग्न ठरवलं जातं. पुढे दोघे भेटतात ते लग्नाच्या दिवशीचं.
चित्रपटाचा सुंदर प्लॉट खूप इंटरेस्टंग आहे. अरेंज मॅरेजमध्ये फसलेले दो अनोळखी आहेत. त्यांना केवळ अरेंज मॅरेजमुळे अडचणी येत नाही तर Long Distance Relationship मधील अडचणींनाही सामोरं जावं लागतं.
एका युजरने लिहिले होते-साऊथचा चित्रपट थलायवाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. तमिळ लोकांनी हा आक्षेप घेतला होता की, चित्रपटामध्ये खूप रुढ़ीवादी पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. दोन्ही कलाकार खास अंदाजात पाहायला मिळतात. टीझरचे कौतुक करण्याऐवजी लोकांना हा टीझर आवडला नाही. तमिळ संस्कृतीला 'स्टीरियोटाईप' करून दाखवण्यात आलं आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला होता.
सान्याने दंगल या चित्रपटातून डेब्यू केला होता. दंगलमध्ये बबीता फोगाटची व्यक्तीरेखा तिने साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
सहा वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिने ९ चित्रटांमध्ये काम केलं आहे. ती चित्रपटांबाबत विचार करूनचं निर्णय घेते. त्यामुळेचं मोठ्या पड़द्यावर तिची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. सान्या दिल्लीची राहणारी आहे. तिने येथूनचं शालेय आणि माहविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की, सान्याला कोरिओग्राफर व्हायचं होतं. तिने वेगवेगळे डान्स -परफॉर्मचे प्रशिक्षणही घेतले आहे.
इतकचं नाही तर कॉलेजमध्ये असताना तिने डीआयडीमध्ये भाग घेतला होता. हा डान्स इंडिया डान्स शो होता. पण, ती फार पुढे जाऊ शकली नाही. मुंबईला आल्यानंतर सान्याने अनेक जाहिराती आणि कॅमेरा पर्सन असिस्टंट म्हणून काम केले. त्यासोबत ती डान्सदेखील शिकत राहिली.
यादरम्यान, मुकेश छाबडा यांची नजर सान्यावर पडली. त्यांनी नितेश तिवारी यांच्या दंगलमध्ये कास्ट केलं.
सान्याने आमिर खानचा चित्रपट सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटातील सेक्सी बलिए कोरिओग्राफ केलं आहे.
२०२२ मध्येही सान्याचं नाव चर्चेत राहणार आहे. तिचे एकामागोमाग एक असे ३चित्रपट रिलीज होतील. यात लव्ह हॉस्टेल, हिट आणि एटली की अनाम या चित्रपटांचा समावेश आहे.
abhimanyu-dassani-vivek-soni-